सय्यद तहेसीन मसुदअली लातूर*
*(UBAB🖋️)*
*९८२२२२०७७३*
*वात्सल्याची मुर्ती*
माय मायेचा हो लळा
प्रेम वात्सल्याची ती मूर्ती,
जणु गार अमराईचा मळा
जगभर तिची हो कीर्ती !!१
माय दोन शब्दांत समावलेली
निस्सिम प्रेमाची सावली,
फाटक्या पदरातही तिच्या
ऊब उबदार मखमली !!२
निसर्गाची ती शान सृजनाची खाण
मायेचा असतो ज्याला आधार,
जगी तो सुखी अाणि समृद्ध
तेव्हा नसे कोणी निराधार !!३
फिटणार ना कधीच
तिचं ऋण हे बाळा,
ती सोसुनिया अनंत कळा
जन्म घालते तुझीया बाळा!!४
रात्र रात्र जोजावून
केलं तुला लहानाचं मोठं,
विसरून कसे चालणार
तिचे अपार मेहनत कष्ट!!५
स्वतःच्या पोटाला चिमटा
देऊन तुला केलं साक्षर,
द्या तिलाही वृद्धावस्थेत
प्रेमआणि मायेचा आधार!!६
त्याग समर्पणाच्या देवीचा
करु या नेहमी सन्मान,
माय जवळ असण्याचा
बाळगू या अभिमान!!७
*सय्यद तहेसीन मसुदअली लातूर*
*(UBAB🖋️)*
*९८२२२२०७७३*




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा