Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ७ मार्च, २०२६

रमजान मुबारक 2026 रोजा नंबर 18 वा रविवार दिनांक 08-03-2026 " मुलींशी घृणा करू नका, त्या सहानुभूतीची प्रतिमा व अति मौल्यवान आहेत " पैगंबर मुहम्मद

 डॉ.सलीम शाहिदासिकंदर शेख

  बैतुश्शिफा मल्टिस्पेशालिटी दवाखाना , श्रीरामपूर

 मो:-९२७१६४००१४



🌷 आज 08 आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्ताने 🌹 

दिव्य कुरआन म्हणतं, " हें ! लोकांनो , आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगा , ज्यानं तुम्हाला एका जिवापासून निर्माण केले आणि त्याच जीवापासून त्याची सहचरणी  बनवले  ,  आणि ,  त्या दोघापासून अनेक पुरुष व स्त्रीयां निर्माण करून जगभर पसरवले , त्या अल्लाहच्या कोपाचे भय बाळगा, ( सुरहा नं 04,सुरह  निसा आ नं. 01)




          इतिहासात फार पूर्वी पासून स्रियांवर अतोनात अत्याचार छळ होत आला आहे ,  जगात प्रत्येक ठिकाणी स्रियावर अत्याचार होतं होतें, जनावरापेक्षा हीं निकृष्ट वागणूक तिला दिली जात होती , स्त्रीला आत्मा आहेत की नाही एवढा छळ, काही ठिकाणी तिची खरेदी विक्री हीं होतं होती . काही काही ठिकाणी स्त्रीला शूद्र समजलं जात असें. भारतात तर पतीच्या चितेवर त्याची विधवा पत्नी जिवंत टाकून सती जात होती.तिला पापाचे मुख आणि पापाचे प्रतिरूप मानले होतें,  जगातील अधिकांश सभ्य समाजामध्ये तिला कसलेही स्थान नव्हतं तिला आर्थिक व राजकीय सामाजिक काहीच स्थान नव्हतं, विवाह पूर्वी पित्या च्या, नंतर पतीच्या, आणि  नंतर पुत्राच्या अश्रित अधीन राहावं लागत असें. आपल्या कोणत्याही अत्याचाराला, त्रासाला, अन्याय ला,  वा भयानक आत्याचाराला आव्हान अगर दाद मागण्यासाठी कुठे हीं जागा नव्हती,  साधी त्याबद्दल तक्रार करण्याचा तिला अजिबात अधिकार नव्हता.

   इस्लाम  नें स्त्री ला अन्याय व अत्याचाराच्या जाळ्यातून मुक्त केलं, तिला स्वातंत्र्य दिलं स्त्रीस सन्मानाने जीवन जगण्याचा हक्क अधिकार दिला. 

                             दिव्य कुरआन म्हणते, " जो कोणी स्त्रीयाच्या अधिकाराचे हनन करील त्यास अंतिम ( महा प्रलया - कायमत ) निवडयाच्या दिवशी ईश्वर ( अल्लाह ) समोर जाब द्यावा लागेल." 

इस्लाम नें पुरुष व स्त्री यांना शिक्षण अनिवार्य केले. मुलींच्या शिक्षणावर विशेष लक्ष दिले,स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होतं.

       1500 वर्षा पूर्वी च्या काळात किरकोळ कारणावरून  वादविवाद होऊन त्याचे भयंकर रूपांतर हत्या -खुन, सतत च्या  कुठेतरी लढाई यामुळे  विधवां व अनाथांचे प्रमाण प्रचंड  प्रमाणात असल्याने विधवांना अतिशय हाल-अपेष्टां -त्रासांना- कुप्रथांना तोंड द्यावे लागत असत व अनाथ मुलांना तर  आधारच मिळत नसें.  विधवांना वेगवेगळ्या नजरेतून पाहिलं जातं होतं . विधवा -घटस्पोटींचे  हाल शब्दात वर्णन करणे अवघड होते . हीं परिस्थिती सर्व  विश्वातील पहिला घटस्फोटीत-विधवा-महिला पुनर्विवाहची संकल्पना  पैगंबर मुहम्मद स्व नीं मांडून   जैद हारिसा नावाच्या एका गुलामाच्या घटस्फोटीत महिलेशी स्वतः विवाह करून तुच्छ समजल्या जाणाऱ्या घटस्फोटीत महिलेला  स्वत:ची पत्नी बनवून बहुमान दिला. पैगंबर मुहम्मद स्व. नीं. आपले  विवाह घटस्फोटीत व विधवा  महिलांशीच करून प्रत्येकीला सम-समान पातळीवर न्याय -  हक्क स्वाधीन केले. काळाच्या प्रवाहात सामील करून मान -सन्मान - बहुमान प्राप्त करून समस्त जगाला क्रांतिकारी पाऊल उचलून विधवा पुनर्विवाह ला चालना दिली.

मुलींच्या विवाह बाबतीत मुलीच्या पालकांना जबाबदारी देऊन विवाह हें मुलींच्या सम्मतिनेच होईल,त्यांच्या इच्छेखातर -शिवाय विवाह करू नयेत. 

                   पैगंबर मुहम्मद स्व. सांगतात, " जोपर्यंत विधवा व घटस्फोट मिळालेल्या महिलेची संमती प्राप्त होत नाही, तो पर्यंत विवाह केला जाणार नाही आणि कुमारी केची अनुमती घेतल्या शिवाय विवाह होणार नाही, ( हादिस बुखारी )

                 दिव्य कुरआन म्हणतं, " अल्लाह ( परमेश्वर ) हें,पृथ्वी व आकाशाचा स्वामी आहे, तो  इच्छितो ते तो निर्माण करतो , तो इच्छितो त्यास मुली प्रदान करतो, तो जें  इच्छितो तर मुले देतो, ( आ. नं. 49 ),   किंवा,  मुले व मुली दोन्हीहीं प्रदान करतो , आणि तो इच्छितो त्यास अपत्यहीन  अवस्थेत ठेवतो. तो सर्वकाही जाणतो,  सर्वज्ञ  आहेत, आणि तो सर्वशक्तिमान आहेत., "  ( सुरहा अल - शुरा आ. नं. 50).

                     अरब अज्ञानकाळात ( इस्लाम पूर्व काळ ) १५०० वर्षांपूर्वी स्त्री भृणहत्या मोठ्या प्रमाणात होत होत्या, मुलांना गर्वाचं साधन समजून ती श्रेष्ठ संपत्ती समजत होतें, मुली त्यांच्या साठी क्लेश दायक वाटत होत्या, हें समाजमनाच्या नसानसात ही कुप्रथा भिनलेली होती, जन्मलेल्या मुलीला अशुभ मानले जात असे,त्यांच्या समजमनात बोलताना देखील मान शरमेने खाली होत होती, जन्मलेल्या मुलीला जिवंत पुरण्याची क्रुर प्रथा होती,  स्थानिक पातळीवर ते प्रतिष्ठेचं प्रतिकं समजलं जातं होते.  पैगंबर प्रेषित मुहम्मद  स्व.नी कन्यावधाला समुळ नष्टच करण्यासाठी अल्लाहाचे भय दाखवत पारलौकिक जीवनाचे नरक - स्वर्ग प्राप्ती बक्षीसांची सत्यता दाखवली.मुलींच्या पालन पोषणा ची प्रेरणादायी कार्य केलं.

     पैगंबर मुहम्मद स्व. सांगतात, " अल्लाह नें एखाद्या व्यक्तीची मुलींद्वारे (घरात जास्त मुली  ) परीक्षा घेतली तरी त्या व्यक्तीने त्यांच्याशी सदव्यवहार करनें अनिवार्य आहेत , याच मुली त्या आई बाबास नरकापासून वाचविण्याचे साधन असतील "  ( हादिस बुखारी ).

               दिव्य कुरआन सांगते की,"  जिवंत पुरलेल्या मुलीला जेव्हा (कयामतच्या दिवशी) विचारलं जाईल की कोणत्या अपराधाची शिक्षा तुला दिली गेली आहे ?" तर ती सांगेल की माझा काहीही दोष - गुन्हा नसताना विनाकारण माझी हत्या करण्यात आली आहे,  हें  या लोकांनी मोठे पातक केले आहे, दोषींना शिक्षा देऊन मला इन्साफ (न्याय) मिळावा  ".

                  तेव्हा अल्लाहा च्या शिक्षेपासून तुम्ही वाचू शकणार नाही,हे ऐकल्यानंतर ज्या -ज्या व्यक्तींनी आपल्या कोमल मुलींना पुरलं होते,त्या प्रत्येक व्यक्ती पश्चाताप करत धायमोकळून ढसढसा रडू लागलेत  ,हे आम्ही काय मोठे  -पाप केलीत म्हणून. 

                   पैगंबर मुहम्मद स्व.सांगतात  ," ज्यांना एक  अथवा अधिक  मुली असेल,  त्या पालकांनी, प्रेमाने,आपुलकीने त्या मुलींचे व्यवस्थिरित्या पालनपोषण, शिक्षण करून  उत्तम वर ( नवरा)बघून त्यांचे विवाह (लग्न) लावून दिले.  तर , त्या प्रत्येक व्यक्तीला जन्नतुल फिरदौस (स्वर्गात)मधे महाल भेटेल .   तसेच ,  ज्या व्यक्तींना दोन- तीन पेक्षाही अधिक मुली असेल, तर त्यांनी न कंटाळता त्या मुलींचे संगोपन व्यवस्थित करून उत्तम वर(नवरा) बघुन त्यांचे विवाह (लग्न) लावून दिले तर जन्नत  (स्वर्गा)त  माझ्या शेजारच बरोबर त्यांचं  महाल असेल व त्याचा मोबदला त्यांना अत्यंत चांगलाच असेल. "(  हादिस तिर्मिझी ). 

                           प्रेषीत मुहम्मद पैगंबर यांना १)हज.जैनब रजि.२)हज.रुकैया रजि,  ३) उममे कुलसूम रजि,४) हज.फातिमा रजि.या चार मुलींचे संगोपन करुन त्यावेळच्या प्रतिष्ठित व्यापारी व घराण्यात लग्न करून दिलेत. 

                 करबला  मोहरम युध्दातील जगाच्या कल्याणासाठी ७२ हौतात्म्य पत्करलेले हजरत इमाम हुसेन व हजरत इमाम हसन च्या आई हजरत फातिमा रजि. या पैगंबर मुहम्मद स्व. च्या सर्वांत छोटी चार नंबरची मुलीचे  मुलं होती.

                      इस्लाम मध्ये स्त्री चे स्वातंत्र्य मोठं अस्तित्व मान्य केलं आहेत, विवाहामुळे तिचे व्यक्तिमत्व पतीच्या व्यक्तिमत्वात विलीन होत नाही, आपल्या पतीची सेविका व दशी बनत नाही.काही लोकं पत्नीला तुछच समजतात, तसे इस्लाम मध्ये बिलकुल नाही.. स्त्री ला आदरचे स्थान देण्यात आलं आहेत.

                      पैगंबर मुहम्मद स्व. सांगतात, " जें तुम्हीं खाल ते तिलाही खायला द्या, जें तुम्हीं वस्त्र घ्याल तेंव्हा तिलाही घ्या, रागाच्या भरात तिला मारू नका, तिच्या तोंडावर मारू नका, तिला बरे वाईट बोलू नका, तिच्याशी मतभेद विकोपाला गेल्यास तिला घरातून हाकलून न देता घरातच अलिप्त राहू द्या ( हदिस :- अबू दाऊद ).

                      पुन्हा, सांगतात की, कोणत्याही श्रद्धावानबंधू नीं आपल्या पत्नीचा द्वेष करू नयेत, ( हादिस :- मुस्लिम ).

पैगंबर पुन्हा सांगतात, " तुमच्यापैकी सर्वोत्तम श्रद्धांवान व्यक्ती जी आहेत की, ज्याची वर्तुणूक चांगली आहेत, आणि तुमच्या पैकी उत्तम तोच आहेत जो आपल्या पत्नीशी सत्यनिष्ठ आणि चांगली वर्तुणूक ठेवील. " ( हादिस,:- मुस्लिम ).

आपल्या पत्नीशी सदवर्तन, चांगलं राहून त्यांचे हक्क त्यांना द्या.

                जगात महिलांना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीतुन वारसा हक्क व आपल्या पतीच्या संपत्तीतुन हीं हिस्सा देणारे पहिले क्रांतिकारी  पैगंबर मुहम्मद स्व. हेच महामानाव.

       जगाच्या इतिहासातील सर्वात  संवेदनशील क्षण म्हणजेच प्रेषित मुहम्मद स्व.नीं आपल्या  अंतिम हाज च्या वेळेस "   आराफात " च्या  भव्य मैदानात " अंतिम प्रबोधन ( खुतबा ) शपथ घेऊन केलं. "    

                          #   !!   "माझ्या जवळ अल्लाह ची प्रतिज्ञा (शपथ) करा ( घ्या ) की, चोरी, व्यभिचार करणार नाही, मुलींची - कन्यावध करणार नाही.आपल्या वडिलांच्या संपत्तीतून मुलींचाही हिस्सा - वाटा - वारसा आहेत  म्हणून त्यांना वारसा हक्क द्या. . तो द्यावा लागेल, बंधुंनो,पतीचे पत्नीवर हक्क आहे ,तसेच पत्नीचे आपल्या पतीवर हक्क आहे.  पत्नीला (बायकांना) प्रेमाने व सहानुभूतीने सांभाळा ,कठोर निष्ठुर होवू नये, त्यांच्या प्रती दयाळु  रहा,  तुम्ही आपल्या अल्लाहाच्या  साक्षीने आपल्या पत्नीला स्विकारले आहे , तर तीची काळजी घ्यावी,  पत्नीचे जे काही आधिकर असतील ते सर्व तीला द्यावे,  तीने तुमच्यावर विश्वास टाकला आहे , तर तीच्या त्या विश्वासाचा विश्वासघात करू नका. तुम्हाला( महाप्रलया) कयामतच्या  दिवशी अल्लाहा समोर आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब द्यावाच लागेल, लक्षात  ठेवा ,या दिवसाची कायम आठवण ठेवा, "!!

                     पैगंबर मुहम्मद स्व नीं आपल्या महानिर्वाणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत   प्रत्येक  वर्गातील समुहाची व विशेषतः महीलांची फार निष्ठेने जातीने काळजी घेतली.

  पैगंबर मुहम्मद स्व. " ज्याला मुलगी असेल त्याने तिला जिवंत दफन ( स्त्री भ्रूण हत्या केली नाही )केली नाही , तिच्याशी उपेक्षेनें कधीच वागला नाही , किंवा, तिच्यावर आपल्या मुलास जास्त प्राध्यान्य दिले नाहीत  तर त्यांना निश्चित स्वर्गात स्थान देईल ".

पुन्हा पैगंबर मुहम्मद स्व. कळकळीनें सांगतात, " मुलींशी घृणा करू नका  त्या सहानुभूतीची प्रतिमा व अतिमौल्यवान आहेत.' हादिस मसनद अहमद ).

           

      लेखन,:- - डॉ.सलीम शाहिदासिकंदर शेख

              बैतुश्शिफा मल्टिस्पेशालिटी दवाखाना 

                       श्रीरामपूर

           मोबाईल   :-  ९२७१६४००१४.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा