*कार्यकारी संपादक*
*एस. बी. तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8378081147*
----- पुणे जिल्हा परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी इंदापूर तालुक्यातील काटी-लाखेवाडी जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बंद पाकिटातून श्रीमंत ढोले यांच्या नावाची शिफारस केली आहे.
मावळचे आमदार सुनील शेळके यांनी नवनिर्वाचित सदस्यांच्या बैठकीत हे बंद पाकीट उघडले आणि गटनेतेपदी श्रीमंत ढोले यांची निवड करण्यात आल्याचे जाहीर केले. या निवडीमुळे इंदापुरात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
श्रीमंत ढोले यांच्या गटनेता निवडीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांनी पाठिंबा दर्शविला. त्यानंतर गट स्थापनेसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांवर सर्व सदस्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर श्रीमंत ढोले यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि पक्षश्रेष्ठींसह सर्वांचे आभार मानले.
शुक्रवारी (दि. ६) प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हा परिषद निवडणुकीचे जिल्हा समन्वयक सुरेश घुले यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक पार पडली. यावेळी आमदार सुनील शेळके, माजी आमदार रमेश थोरात, माजी आमदार अशोक पवार, माजी आमदार संभाजी कुंजीर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दुगडि, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते, देवराम लांडे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर, राजेंद्र कोरेकर, विठ्ठल शिंदे, जिल्हा परिषदेतील माजी गटनेते शरद बुट्टे पाटील आदी उपस्थित होते.
श्रीमंत ढोले यापूर्वी २०१२ ते २०१७ या कालखंडात जिल्हा परिषदेचे सदस्य राहिले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही इंदापूर तालुक्यात श्रीमंत ढोले यांनी विजयश्री खेचून २० हजार ७९९ सर्वाधिक मते मिळवली आहेत.
------------------
काटी-लाखेवाडी गट आणि गणाला गटनेतेपदाचा बहुमा
काटी-लाखेवाडी गटाचे जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले हे जिल्हा परिषदेचे गटनेते, तर इंदापूर पंचायत समितीच्या गटनेतेपदी याच गटातील काटी गणाचे पंचायत समिती सदस्य वरकुटे खुर्द ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच बापूराव शेंडे यांची इंदापूर पंचायत समितीच्या गटनेतेपदी निवड झाली आहे. दोन्हीही गटनेते याच गटातील होण्याचा बहुमान काटी लाखेवाडी गट आणि गणाला मिळाला आहे.
---------------------------





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा