Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ९ मार्च, २०२६

*रमजान मुबारक 2026* *रोजा नं. 20 वां,* मंगळवार दिनांक 10-03-2026 मक्का विजय : - कोणावर हीं सूड उगविण्यात येणार नाही.. सार्वजनिक माफी चा दिवस*

 डॉ.:- सलीम शाईदा सिकंदर शेख 

बैतुशशिफा मल्टिस्पेशालिटी  दवाखाना 

श्रीरामपूर, 

जिल्हा :- अहमदनगर 

मोबाईल 9271640014..


आज 20 रमजान, इस्लामी इतिहासातील सर्वात अतुलनीय अभूतपूर्व व आठवणीच्या हिंदोळ्याचा खास दिवस. अर्थात रक्त हीन क्रांती चा मदिना विजय.. सार्वजनिक माफी चा दिवस.

                  #    दिव्य कुर आन सांगतो, " जर त्यांनी शांती घडवून आणण्याची इच्छा दाखवली तर, तुम्हीं देखील त्यांच्याशी शांती प्रस्थापित करा, अल्लाह ( ईश्वरा ) वर भरोसा ठेवा. खरोखर ! तोच सर्व काही ऐकणारा व सर्व काही जाणणारा आहे. ( अल - अन फाल आ. नं. 61).   # आणि! ते जर त्यांनी(शांती स्थापीत करण्याचे नाटक करून ) धोका (फसवायचे) देण्याचे उद्देश बाळगून असतील तर, निश्चितच अल्लाह ( परमेश्वर ) तुमच्या साठी पुरेसा आहे. " अल - अनफाल आ. नं. 62).



               हजरत मुहम्मद स्व. यांचा जन्म इसवी 570 मध्ये कुरेश काबील्यात झाला, सरासरी 1250 मैल लांब व 750 मैल रुंद असा सुमारे 10 लाख चौ. मैल, अर्थातच 30 लाख चौ. किलोमीटर क्षेत्रफळाचा भुभाग त्यामध्ये 90% भाग हा वाळवंटाचा, भारतासारखीच तिन्ही बाजूने समुद्री किनारा, याच भागात एका  पट्ट्यात सुपीक पट्टा, अन , याच पट्ट्यात पवित्र मक्का व मदिना ही शहरे, वाळवंटी भागामुळे येथील जीवन मान भटकंती चे होते, मेंढपाळ, व्यापार, लूटमार, हें येथील प्रमुख व्यवसाय, त्यातच येथे थोडयाशा गोष्टीं मधून रक्त रणजित संघर्ष,  संपूर्ण  अराजक्त परिस्थिती, चोरी डकैती, लूटमार, खून खराबी येथील रोजचाच, दारू, झुगार चुकीच्या रितिरिवाज , परंपरा चालीरिती वेगवेगळ्या,  स्त्री फक्त्त भोगवीलासासाठी,  नाच गाणं, वेश्या व्यवसाय, मुली जन्मला आल्याबरोबर  मुलींना त्या जन्म दात्या  बाप स्वतः त्या जिवंत मुलींना पुरून शेखी मिरवत .भयानक परिस्थिती, एवढ्या अराजक्त परिस्थितीत  अल्लाह नें 570 मध्ये हजरत मुहम्मद स्व. यांचा जन्म झाला,  जसे जसे वाढत  तसे अल्लाह ( परमेश्वर ) त्यांना विकसित करीत होते.. त्यांना वयाच्या चाळीसव्या (40) वर्षी.. पैगंबर -प्रेषितत्व अर्थात अल्लाह चा संदेश वाहक , अल्लाह संदेश वार्ता जगात सर्व विश्वासाठी  सांगणारा.

    प्रेषित मुहम्मद स्व.लहानपणापासून पुरोगामी -परिवर्तन वादी मताचेच होते,  पैगंबर =(संदेशवाहक ) झाल्या नंतर त्यांच्या कामाने परिवर्तन ला वेग आला, त्यांनी एकेश्वर वादाची अर्थात जगात एकच अल्लाह ( परमेश्वर - भगवंत ) आहेत. अरब समाज मनात असंख्य देव देवता मानणारा व पूजा करणारा समाज होता प्रत्येक दिवसाचा एक देव असें 365 मुर्त्या, पुन्हा प्रत्येक काबील्या वेग वेगळेच देव,  असा काहीतरी विचित्र व अघोरीं वेगवेगळे प्रकार त्या अरब जगतात निर्माण झाले होतें  अंधश्रद्धा तर शिगेला पोहचली ,  त्या वेगवेगळ्या देवदेवतांचे वेगवेगळं नवस भोग असं विचित्र प्रकार , यामुळे संपूर्ण अरब प्रदेश अतिशय मागास, म्हणून त्यामध्ये काहीतरी सुधारणा व्हावी म्हणून परमेश्वर ( अल्लाह ) चा , संदेश देण्यासाठी दिवस रात्री मेहनत घेत होते.. ही परिवर्तन  नांदी ची चाहूल होती यामुळे जुन्या सर्व प्रथा,रितरिवाज, परंपरा,  प्रथा बंद होऊन नवीन पुरोगामी पद्धत येऊन मानवी कल्याणस काहीतरी चांगले होण्याची सुरुवात प्रेषित मुहम्मद स्वनीं केली होती, त्यांच्या या परिवर्तन वादी चळवळीस बरेच समविचारी मित्रांनी साथ देण्यास सुरुवात केली,  परिवर्तनाची सुरुवात चांगल्या रीतीने पुढे जातं होती, कोणतेही परिवर्तन हें लवकर कधीच होत नसते ती हळू हळू निरंतर होणारी असतं व त्या मध्ये अगदीच टोकाचा विरोध होणं सहजकीच असते, म्हणून तेथील तथाकठीत सरमजामशाही वादी मंडळी नें अतोनात विरोधाला सुरुवात केली, जागोजागी छळ, त्रास देत होते,  सरंमजाम शाही वादयानी तीन वर्षे आर्थिक -सामाजिक -बहिष्कार टाकून त्यांच्या व त्यांना  मानणाऱ्या मित्रपरिवाराला तीन वर्षे आर्थिक सामाजिक बहिष्कारानें खूप त्रास दिला गेला, त्या सर्वांनी अतोनात छळ  11 वर्षे सहन केलेत, याला काहीतरी सीमा असतात परुंतु त्रासाची सीमा ही जीवावर  आली  पैगंबरांना जीवे मारण्याचा कट कारस्थान करण्यात आले. शेवटी अल्लाह चा आदेशानुसार दिनांक 16 जुलै 622 रोजी मक्का सोडून मदिना येथे स्थलांनस्तर करण्यात आले. अर्थात " हिजरत " करण्यात आली.

मदिना व आसपासच्या हजारो किलोमीटर च्या परिसर तसेच जवळच असलेल्या आफ्रिकन देशा पर्यंत इस्लाम चा मानवता वादी प्रसार - प्रचार जोरात  चालूच होता. हें पुरोगामी परिवर्तन बघून पैगंबर व  सहकारी मित्र यांच्या आचार -विचार व जीवन शैली  बघून हजारोच्या संख्येनें रोज लोंढेचे लोंढे येऊन इस्लाम धर्म स्वीकारात होते.  बंधूनची प्रगती उन्नती उत्साह बघून तेथील बंधूना ही मक्का वासिय अरब त्रास देत होते, मधल्या काळात किरकोळ कारणावरून लढाया, रक्त रंजित खुनी संघर्ष  सतत चालूच, त्यामधीच  काही प्रसिद्ध लढाया प्रसिद्ध  आहेत,  याचं प्रमाण फार जास्तच झालं होतं.  प्रत्येक गोष्टीचा अतिरेक झाला म्हणून  याला कुठेतरी आळा घातला पाहिजे , म्हणून  यावर तोडगा म्हणजे परस्पर समझोता -( तह -) हुदैबिया " या गावात "- सुलाह हुदैबिया " म्हणून  जगतात प्रसिद्ध आहेत.

सुलाह -हुदैबिया समझोत्याची मर्यादा 10 (दहा )वर्षाची ठेवण्यात आली होती,   दोन्हीही बाजूच्या बऱ्याच अटी शर्ती ना मान्यता देण्यात आली होती, विरोधी मक्कावासियांनी   जास्त प्रमाणात जाचक अटी घातल्या होत्या ,   येवढ्या जाचक अटी असूनही प्रेषित मुहम्मद स्व यांनी शांततेसाठी -  अजून जास्त" रक्त - सांडू  "नाहीं  यासाठीच आपल्या सहकारी मित्राच्या नाराजी ओढावून  ही मान्य केला. ( अटी शर्ती मोठया आहेत असो ).

थोड्याच काळात , दोन - अडीच वर्षांमध्येच मक्कावासियांनी शांतता करार - समझोता उल्लंघन करण्यास सुरुवात केली. वारंवार या कराराचे उललंघन होत होते,  कुठपर्यंत त्रास सहन करायचे, याची परिसिमा गाठली, शेवटी अतिरेक झाला म्हणून,    पैगंबर  मुहम्मद स्व. नी  मक्का कूच करण्याचा आदेश  ( दिनांक 23-डिसेंबर 629 ) 10 रमजान o8 हिजरी.ला काढून , दहा( 10) दिवसात कोणतीही खबर इकडे तिकडे पोहचणार नाहीत हीं बातमी गुप्त ठेवता , आपल्या दहा हजार सैनिक व लष्करी ताफया सह  दहा दिवसाचा प्रवास करून (दिनांक 2 जानेवारी 630 रोजी  ) हिजरी तारीख " 20 रमजान 08,"   सकाळी मक्का शहरात पोहचले.    मक्कातील प्रत्येक नागरिक  अचानक झालेलं हें चित्र बघून अक्षरशा भांबवून सैरा -वैरा पळत सुटला, कोणालाच काही कळत  नव्हतं, काय करावं ते. कारण  मक्कावासियांना माहित होते,त्यांनीच स्वतः वर हीं वेळ आणली होती, आपल्या पूर्वज. लोकांनी प्रेषित मुहम्मद स्व.च्या अनुयायीनां , मित्रांनां, सहकाऱ्यांना किती अतोनात त्रास दिला- छळ केला - खुनी व रक्त रंजित संघर्ष केला या जणींवेतून,  आपण केलेल्या पापाची जाणीव असल्यामुळे जीव मुठीत घेऊन जीव वाचवीत  कुठं लपायला जागा भेटते ते शोधत होते,  लहान मोठे अगदीच धस्तावलेलं होते, याला इलाज काहीच नव्हता.  कारण केलेल्या  पूर्व कृत्याना या जगात  माफी तर नाही व मिळणारच नव्हती व माफिच्या लायक ही नव्हतं.

वैर, एवढ्या छळ -हाल -अपेष्ठा, देणाऱ्या एका काळातील वैरी मक्का तील प्रत्येक नागरिक हा सजा देण्याच्या लायकीचा असताना हीं मक्का विजयाच्या दिवशी पैगंबर मुहम्मद स्व. नीं प्रत्येकाला प्रत्येकाचे नावं घेऊ घेऊ  याला माफी, त्याला माफी, तुला माफी, तुमच्या सर्व कुटुंबाला हीं माफी. 

            कारण आज पैगंबर मुहम्मद व त्यांच्या सहकाऱ्यांना बदला घेण्याचा बदल्याचा दिवस होता, अतोनात यातना त्रास छळ ज्यांनी केला त्या सर्वाना शिक्षा करण्याचा दिवस होता.

एका युद्धात  पैगंबर मुहम्मद स.चे आवडते चुलते हजरत हमजा रजि. हें पैगंबर मुहम्मद स. नां प्रत्येक गोष्टीमध्ये तन मन धनाने साथ - मदत करायचे.  एकदम प्रिय चुलते हजरत हमजा रजि.ना एका महत्वाच्या युद्धात  वीरगती प्राप्त झाल्यानंतर विरोधी मक्का सरदार अबू सुफियान ची पत्नी " हिंदा " नें हमजा रजि. चे " काळीज " काढून खाल्लं  व दोन्ही " कान "कापून आपल्या गळ्यात माळ घातली होती. अशा निर्दयी कौर्य करणाऱ्यांना माफी मिळणे तर अश्यक्य कोटीतीलच. तिला व तिच्याशी संपर्क असणाऱ्या सर्वाना फाशी होणार होणार होणं  गरजेचं असताना.

ज्या चुलती हिंदा हिने प्रिय चुलते अबू हमजा रजि. यांचे काळीज खाल्लं व कानाचा गळ्यात हार घातला होता अशा क्रूर कर्म करणारी "  चुलती हिंदा ." . मक्का विजयाच्या दिवशी हिंदा आपली ओळख पटू नयेत म्हणून आपलं तोंड झाकून क्षमा दानात आली होती परंतु पैगंबर मुहम्मद यांनी तिला ओळखलं आणि आपल्या  प्रिय चुलत्याची आठवण काढून रडत रडत म्हणाले आज " हिंदा " आज तुलाही माफी माफी.

                     मक्के च्या काबागृहा जवळच घोषणा केली कीं " आज कोणावरही सूड उगवला जाणार नाहीं... कोणाची ही हत्या करण्यात येणार नाहीं. कोणाचाही बदला घेण्यात येणार नाहीं.. जें आप आपल्या घरात लपून बसलेले आहेत त्यांना ही माफी.


                           यावर , अगोदर कुणाला ही विश्वास बसला नाहीं    व   बसत ही नव्हता कारण त्यांनी केलेल्या क्रूर कर्मा ची शिक्षा ही फाशीच होतं होती,...परुंतु झाले उलटंच.

                          त्या घडीला पैगंबर मुहम्मद स्व. यांच्या कडे लष्करी ताकत,  सर्वभौम सत्ता -  अफाट साम्राज्य - संपत्ती - व सर्व गोष्टी  युक्त होते  त्यांना कोणीही रोखू शकत नव्हतं.

    एवढं सर्व परिस्थिती असून सुद्धा , बदला घेण्याचा दिवस असून हीं त्या बदल्यात आपल्या दुश्मनांना एवढे मोठ- मोठ्ठाल्ले पापी  कृत्याच्या बदल्यात माफी... सार्वजनिक माफी...

               तो दिवस होता 20 वां रमजान रोजा  08 ( आठ) हिजरी. इसवी सन होतं 2 जानेवारी 630... आणि  आज  20 वीस  रमजान रोजा हिजरी 1447. तारीख 10- मार्च 2026 मंगळवार..!

              " जो: सर्व शक्ती शाली असूनही : बदल्याची भावना ठेवत नाहीं.. तोच खरा.. शक्तिशाली श्रद्धांवान ( बंधू ).. त्यालाच अल्लाह पसंद करतात. " पैगंबर मुहम्मद स्व..


(मित्रांनो लेख आवडला तर मित्र व नातेवाईकांना जरूर पाठवा.. प्रतिक्रिया अवश्य नोदवां..)


डॉ.:- सलीम शाईदा सिकंदर शेख 

बैतुशशिफा मल्टिस्पेशालिटी  दवाखाना 

श्रीरामपूर, 

जिल्हा :- अहमदनगर 

मोबाईल 9271640014..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा