Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ११ मार्च, २०२६

*रमजान मुबारक 2026* *रोजा नं. 22 वा* *गुरुवार दिनांक 12-03-2026* *रोजा :- " तुमच्या प्रत्येक हाकेला** *बरोबरच असतो " दिव्य कुर आन*

 *डॉ. सलीम शाईदा सिकंदर शेख* 

*बैतुशशिफा मल्टिस्पेशालिटी* *दवाखाना*

*श्रीरामपूर*,

 *जिल्हा :- अहमदनगर* 

*मोबाईल   9271640014*



" कोई सुनता नहीं दुआ के सीवा : 

               कोई सुनता नहीं खुदा के सीवा "!! 

                     पैगंबर मुहम्मद स्व चे मित्र, अबू हु्रेरा रजि. सांगतात , आम्हाला, प्रेषित मुहम्मद स्व. नी सांगितलं,  " अल्लाह रबबूल इज्जत म्हणतात, कीं,  " अद - इंद - जननीं -बी - व -अन - मआहूं - इजा - दनीं "

अर्थात :- "  मी आपल्या अनुयायी ( बंदे ) साठी असा आहेत कीं, जसा तो माझ्या बद्दल विचार करतोय किंवा आठवण करतो : आणि जेव्हा हीं तो मला हाक ( पुकारतो )मारतोय  :,  त्या- त्या वेळी त्याच्या बरोबर मी असतो ".( सहीहं बुखारी ).

                   पुन्हा एकदा प्रेषित मुहम्मद स्व. सांगतात , " तुमच्या रब (अल्लाह - परमेश्वर ) ने सांगतो  , " मला तुमची दुआ करत चला आणि तुमचे प्रार्थना - विनंती ( दुआ- याचना - ) मी जरूर कबूल(मान्य )करतो . ( मसनद ए हादिस, तिरमिझी, अबू दाउद, इब्न माझा, ).



                   इस्लाम मध्ये  दुआ प्रार्थना करण्याचे  महत्व आहेत.

" दुआ "  हा अरबी शब्द आहेत, त्याचा शब्दशा आर्थ एखाद्याला बोलावणं होतं, तसे अरबी भाषेत एका शब्दाचे तीस अर्थ होतात, परंतु आपल्याला याचा आर्थ अल्लाह कडे कळकळीची याचना - विनंती -मागणी करणं-मागणी मागणं- आपण आपली याचिका अल्लाह कडे सादर करणं, अल्लाह कडे कृपेची -दयेची याचना करणं, अल्लाह कडे आपल्या प्रत्येक गरजेच्या गोष्टी मागणं,  प्रत्येक समस्यांचे  ग्रहाणे विश्व च्या मालक अल्लाह -(ईश्वराकडे)  हा सर्व शक्तीमान अशा अल्लाह कडे मांडत असतो..

              संशोधन करणाऱ्या संशोधकांनी असं म्हटलं की आज च्या डिश टीव्ही द्या जमान्यात त्या टीव्ही ची तबकडी हीं अर्ध गोलाकार असते व काही संशोधन केंद्रात फार मोठी अर्ध्यागोलाकार तबकडी वजा यंत्रणा बसवलेली असते. ती यासाठीच की अंतराळातुन आकाशातून जें संदेश येत असतात ते संदेश त्या अर्ध्या गोलाकार तबकडी त लवकर आकर्षित होतात... हा कॉन्दोन्हीही म्हणू या. आपण जेंव्हा जेंव्हा अल्लाह कडे याचना दुआ करतो त्या वेळी दोन्हीही हाताच्या ओंजळी सारखा अर्धा गोलाकार भाग बनवूनच दुआ करतो.. त्याचाच प्रतिकृती संशोधकांनी घेतली असेल. असो.

दुआ म्हणजेच इस्लाम मध्ये उपासनेंचा  प्रकार आहेत, प्रत्येक मुस्लिम श्रद्धांवंताच्या दुआ चे खूप महत्व आहेत, प्रत्येक गरजे साठी दुवा करणं म्हणजेच एक उपासना कारणच आहेत.

प्रेषित मुहम्मद स्व.नी एका ठिकाणी म्हटलं  " दुआ करणं म्हणजे,तुम्हीं केलेल्या सर्व उपासना चा सार आहेत. व तुम्हीं कधी दुआ नाहीं केली तर अल्लाहला फार राग येतो.' हा प्रकार म्हणजेच अल्लाह ची प्रतार्णा करणं,  असं फक्त्त गर्विष्ठ लोकं च करतात, म्हणून थोडी जरी अल्लाह ची उपासना केली तरी अल्लाह कडून छोटं बक्षीस घेणं हे  अल्लाहला खुश करण्या सारखं असतं.. नाहीतर ते आपल्याला "अहंकार "झाल्या सारखं होतं. अल्लाह ला अहंकारी पसंत नाहीं.  " गर्वाचं घर खाली "  असतं म्हणतात.

                       प्रत्येक श्रद्धावंत बंधू प्रत्येक आणीबाणी संकटाच्या काळात जवळच्या मित्रा सारखा , हो अगदी जवळच्या मित्रा सारखाच अल्लाहच वाटतो. अगदी मित्रा सारखं म्हणजे अल्लाह जवळ आरे कारे च्या भाषेत तच दुवा केली जाते, जसा काय अल्लाह आपल्या समोरच  बसलेला आहेत एक विश्वासूं मित्रासारखा मित्र,मोठा भाऊ.विश्वासू.

                     प्रेषित मुहम्मद स्व. सांगतात ,  "अल्लाह जवळ येवढ्या भरवश्याने दुवा करा ,  कीं , तो संपूर्ण   समस्या एकूण घेऊन आपल्या सर्व इच्छा -आकांक्षा (मुराद )मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारचच आहेत येवढ्या भरोसा ठेवून दुवा करा " ( हादिस तिर्मिजी ).

                दिव्य कुरआन मध्ये अल्लाह म्हणतात , " हें पैगंबर स्व.!  जेंव्हा माझे   श्रद्धांवान  माझ्या बाबतीत तुम्हाला विचारतील, तर, तुम्हीं माझ्या वतीने त्यांना सांगा कीं,  तो  अल्लाह ( परमेश्वर - भगवंत ) तो तर तुमच्या अगदीच निकट ( जवळ )च आहेत, आणि,  कोणी हाक दिली , तर , तो तुमच्या हाक देणाऱ्याच्या हाकेला मी प्रतिसाद देत असतो, " , जे अनुचित ( चुकीच्या ) मागण्या सोडून सर्व योग्य मागण्या पूर्ण करतोय." ( पारा  01, सुरह  नं. 02, अल -बकराह आ. नं. 186).

जेंव्हा जेंव्हा तुम्ही संकटाच्या विळख्या मध्ये असतात तेंव्हा तेंव्हा तुम्ही अल्लाह कडे याचना करतात, अर्थात आपण प्रत्येक्षात संपूर्ण सृष्टीच्या मालकासमोर, विश्वाच्या निर्माण कर्त्या समोर आपलं म्हणणं रूपी अर्ज सादर करत असतो म्हणून आपलं सर्व अहंकार सोडून दुवा जरूर कराव्यात, घडी घडी दुवा करावे. म्हणजे आपल्या हृदयात एक कोमलता निर्माण होते, अहंकार नष्ट होतं, मी पणा च पतन होतं हृदय हलकं होतं. एक प्रकारचा विश्वास निर्माण होतं, व कोणत्याही गरजेसाठी सरळ सरळ अल्लाह च्या दरबारात हात पुढे करून पसरून दुवा याचना करून, ती पूर्ण करायची,

पैगंबर मुहम्मद स्व. म्हणतात ना , " दुआ मोमीन का हत्यार है...."

                " हार बार मांगा करो तो क्या हासील :

               दुआ वही है जो दिल से कभी निकलती है!!

( मित्रांनो लेख आवडल्यास मित्र व नातेवाईकांना जरूर पाठवा, त्यांचा ही फायदा नक्कीच होईल.. प्रतिक्रिया आवश्य कळवा ) 


लेखन :- डॉ. सलीम शाईदा सिकंदर शेख 

बैतुशशिफा मल्टिस्पेशालिटी दवाखाना 

श्रीरामपूर,

 जिल्हा :- अहमदनगर 

मोबाईल   9271640014

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा