*इंदापूर, डॉ. संदेश शहा*.
*टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो.९९२२४१९१५९*
महिलांनी स्वतःला सिद्ध करून उद्योजक होण्यास सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन उद्योजिका सौ. अनुसया शंकर सूर्यवंशी यांनी केले.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विद्या प्रतिष्ठान इंदापूर पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये दि.९ मार्च २०२६ रोजी महाविद्यालयाच्या ऑडिटोरियममध्ये महिला सक्षमीकरणावर विशेष कार्यक्रम संपन्न झाल्या. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उद्योजिका सौ. अनुसया शंकर सूर्यवंशी तसेच स्कूल ऑफ आर्किटेक्चर, विद्या प्रतिष्ठान, बारामती येथील प्राचार्या डॉ. राजश्री पाटील उपस्थित होत्या. यावेळी प्रमुख पाहुण्या सौ. अनुसया सूर्यवंशी यांनी आपल्या उद्योजकीय प्रवासातील अनुभव सांगत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
सौ. अनुसया सूर्यवंशी यांनी स्पर्धेच्या युगात महिलांचा
आत्मविश्वास, स्वावलंबन आणि उद्योजकतेचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थिनीं कठोर परिश्रम, जिद्द आणि सकारात्मक दृष्टीकोनाच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करू शकतात असा संदेश त्यांनी दिला. महिला सन्मान दिनाच्या निमित्त त्यांनी महिलांचा सन्मान, समानता आणि सक्षमीकरणाचा संदेश दिला. विद्यार्थिनींनी शिक्षणाबरोबरच उद्योजकतेकडेही लक्ष द्यावे, नवीन कल्पना विकसित कराव्यात आणि रोजगार निर्माण करणाऱ्या बनावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी डॉ. राजश्री पाटील यांनी उद्योजकता व व्यवसाय क्षेत्रातील महिलांच्या संधी आणि आव्हाने याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी आत्मविश्वास, कौशल्य आणि नव्या संधींचा स्वीकार करून स्वतःचे करिअर घडवण्याचा संदेश त्यांनी दिला. डॉ. पाटील यांनी विद्यार्थिनींना उद्योजकतेकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचे आवाहन केले. केवळ नोकरीच्या संधी शोधण्यापेक्षा नवीन कल्पना, नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्वतःचा व्यवसाय उभारण्याची मानसिकता विकसित करणे गरजेचे आहे. शिक्षण घेत असतानाच विद्यार्थिनींनी आपल्या कौशल्यांचा विकास करून आत्मनिर्भर बनावे, असा अनमोल सल्ला त्यांनी दिला
कार्यक्रमात महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी इतिहासातील महान स्त्री व्यक्तिमत्त्वांवर आधारित केलेले भूमिका सादरीकरण सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. यामध्ये
श्रद्धा गलांडे – जिजाऊ, मनीषा ओव्हाळ – सावित्रीबाई फुले, मानसी चौधरी – महाराणी येसूबाई, सृष्टी जगताप – महाराणी ताराबाई, अदिती शिंदे – सरोजिनी नायडू यांनी प्रभावी सादरीकरण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अश्विनी बनसोडे आणि श्रावणी मखरे यांनी सामाजिक संदेश देणारे नाट्य सादरीकरण करून कार्यक्रमाची गोडी वाढवली. यावेळी प्रा. प्रियांका सूर्यवंशी यांनी महिला या अबला नसून सबला असल्याचे मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या महिला तक्रार व निवारण समिती अंतर्गत आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोनाली काळे यांनी तर आभार प्रदर्शन भारती नलवडे यांनी केले. हा कार्यक्रम महिला तक्रार व निवारण समितीच्या अध्यक्षा प्रा. विद्युलता जाधव, प्रा. सचिन पवार आणि प्रा. संतोष देवकाते यांच्या नियोजनातून यशस्वीपणे पार पडला. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झाला.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा