*डॉ. सलीम सिकंदर शेख*
*श्रीरामपूर*
*मोबाईल 9271640014*
अल्लाह( परमेश्वर). म्हणतात, " आम्ही या ( कुरआना ) च्या प्रकटीकरणाची( सुरुवात )भाग्य निश्चित करण्याच्या रात्रीं केलेली आहेत (1), तुम्हाला काय माहित, या रात्रीं चे महत्व काय आहेत??, (3), ती, एक रात्रं हजार महिन्यानंच्यापेक्षा हीं उत्तम आहेत (4)., त्या रात्रीं असंख्य स्वर्गदुत त्या (प्रमुख स्वर्ग दुता पैकी एक असलेलें जिब्राईल आमीन ) पालनकर्त्याच्या परवानगीनें प्रत्येक गोष्टीसंबधीचे प्रत्येक आदेश जमिनीवर उतरतात (5). पहाट होयी पर्यंत ती पवित्र कद्र ची रात्रं शांतता व सुरक्षिततेची रात्रं आहेत.(6).
या पवित्र लैलतुल कद्र ची एक रात्रं आज आपल्याला भेटत आहेत, तर अशा पवित्र रात्रीत भरपूर आपल्या जीवनात केलेल्या वाईट कृत्यांची मनमोकळ्या मनानं माफी. म्हणजेच तौबा करणं.
तौबा या अरबी शब्दाचा अर्थ" लौटाना, वापस लौटाना " टु रिटर्न" किंवा " पश्चात्ताप " चुकीच्या विचार- आचारांवर , चुकीच्या वर्तुनुकी व कृतीवर केलेल्या चुकीला पश्चात्ताप करणं .
प्रेषित मुहम्मद सल्लम.चे आवडते नातु हजरत हुसैन बिन अली रजि.म्हणतात , पहिला अनिवार्य जिहाद तो आहे की ,जो व्यक्ती अल्लाह च्या नावडत्या कार्यापासून दुर राहण्यासाठी स्वतःच्या मनाला ताब्यात ठेवतो."
दिव्य कुरआन म्हणते " अल्लाह जवळ क्षमा - माफी मांगा , अल्लाह निससंदेह खुप क्षमाशील व दयावान आहे " ( सुराहा नं.९ वा, सुरह तौबा आ.न.४ थी .)
म्हणजेच आपल्या सर्व पापांची क्षमा मागण्याचे दिवस ..तर आपण केलेल्या छोट्या छोट्या व मोठ्या पापांची कबुली देउन क्षमा मागणे .जसे , व्यवहारात कमी जास्त प्रमाणात खोटे नाटे करणे , आईवडील - बहीन भाउ , मुलं, मित्र नां काहीतरी वेडेवाकडे बोलणं , आईवडीलांना नाराज करणे,कोणी आपल्या मेहनती च्या जोरावर पुढे प्रगती करत असतोस परंतु पाठीमागे वेडेवाकडे बोलणं, नस्ती आळ घालणं , खोटे गुन्हा दाखल करणं , त्यांच्या बद्दल खोटे नाटे अफवा फैलावुन बदनाम करणं .तो मित्र किंवा व्यक्ती आपल्या मेहनतीच्या, कष्टाच्या , हुशारीवर मोठा होत असतो म्हणून त्याची निंदा नालस्ती पाठीमागे करणं हा ईस्लाम मध्ये सर्वात मोठा गुन्हा समजला जातो. मुलींच्या , स्रीयांवर, नाहक काही तरी आळ घालणं हा ही सर्वात मोठा गुन्हा ठरतो याला तोहमत लागणा सबसे बडा गुन्हा सगिराह ( माफ न करण्यासारखा )मानला जातो. , वादा खिलापी करणं , खोटं बोलणं ,असे असंख्य प्रकारचे गुन्हे करणं. आणि त्या सर्वांची माफी मागतो तो " तौबा " करतो .
दिव्य कुरआन मधील नववा (९) वा सुराहा " तौबा "प्रेषित हजरत मुहम्मद सल्लम.च्या मदीनां काळातील अखेरच्या टप्प्यात " तबुक" युध्दाच्या प्रथम ,तबुक युद्धामध्ये व शेवटी अवतरीत झाली आहे, तबुकचे रहिवासी प्रेषित मुहम्मद स्व सल्लम यांना वारंवार त्रास देत ,कधी कधी तर त्यांनी सुलहा करुन पुन्हा तो तोडीत म्हणजेच वादा खिलापी करणं चालुच होतं , प्रेषित मुहम्मद स्व सल्लम त्यांना वारंवार माफी क्षमा देत ..
दिव्य कुरआन मध्ये जवळजवळ सत्तर (७०) वेळा " तौबा' चं म्हणजेच तुम्ही झालेल्या पापांची अल्लाह रब्बुल आलमीन जवळ " माफी" तौबा चे शब्द आलेले आहेत.
प्रेषित मुहम्मद स्व . सांगतात, " जो व्यक्ती अल्लाह च्या थोड्याशा रोजी देत असेल तर जो व्यक्ती त्या थोड्याशा रोजी वर ही समाधानी ( खुश ) आनंदी, असेल, तर अल्लाह खुश होऊन त्याने मागितलेल्या थोड्याशा" तौबा" वय खुश होउन माफ करतात. " (हादीस बैहकी ४४०९ अन् अलि रजि).
यावरुन प्रेषित मुहम्मद स्व सल्लम सांगतात, " अल्लाह ( ईश्वरा) ने दाखविलेल्या सरळ मार्गावर चालत तुम्हाला किती ही त्रास झाला तर तो त्रास सहन करत त्यावर शांत राहा, . सुरुवातीला तुम्हाला तो असह्य होईल , दुःख,यातना भोगव्या लागतील शेवटी येथ पर्यंत की त्रासांचे काटे तुम्हाला बोचतील परंतु तुम्ही शांत राहा, त्या त्रासाच्या बदल्यात तुमची सर्व पापं माफ होतील " ( हादीस अल - बुखारी शरीफ न.५६४१ ).
सर्व पापं माफ करणारे ,तौबा( माफी )कबुल करणारं अल्लाहच आहेत, वारंवार -सतत - वारंवार तौबा करत चला . अल्लाह चे असंख्य - अनंत नावे आहेत ,उदा.या रहमान, या रहीम , या कुद्दसू, या मालिकू , या अझाझु, या सत्तारू , या गफफारु , या जब्बारू , या कहहारु, या रज्जाकू असंख्य विशेष अनेक अनंत नावं विशेषनं वापरण्यात आलेली आहेत , असं कोणतेही नावे घेऊन , मी खुप गुन्हे केलेले आहे, मी फार मोठ्ठा गुन्हेगार आहे, मी फार मोठ्ठा खताकार आहे, मी फार मोठ्ठा मुजरीम आहे, शेवटी मी जो काही गुन्हा केलेला असेल तो माफ - क्षमा कर. तु अल्लाह फार मोठा व तु अनंत आहे , तु प्रथम व शेवट आहे , तु तर माफी तौबाला मागणाऱ्यानां पसंद करत असतो . आम्ही वारंवार गुन्हा करुन वारंवार तुझ्या कडे माफी -.माफी- तौबा करतो तर तु माफ करून तौबा कबुल करतो हे आम्हाला पक्कं ठाऊक आहे , आम्हाला नक्कीच माहित आहेत विश्वास आहेत की आमची याचना -तौबा - माफी - कबुल करणारा आहेत तर आम्हाला जरूर माफ कर ..व्याकूळ होऊन पुन्हा - पुन्हा साकडं घालून तौबा माफी क्षमा मागण्याची असते..
सध्या पवित्र रमजान मुबारक महिन्याची पवित्र रात्र लैलातुल कद्र ची हजारो महिन्यांच्या रात्रीं पेक्षाहीं मोठी फक्त्त एकच रात्रं आहेत म्हणजेच एका रात्रीत कमवलेलं पुण्य सबाब हें हजारो महिन्यांच्या पटीने असतं..
तौबा कबुल करण्याचा पर्व आहे...ऑफर आहेत बोननझा पेक्षा हीं अतिभव्य दिव्य ऑफर संधी..
प्रख्यात गायक नुसरत फतेह अली खाँ तौबा कबुल होण्याच्या भरोशाने आपल्या कव्वालीमध्ये म्हणतात की,
" तु माफ करेंगां मेरे सारें गुनाह...मेरी तौबा..मेरी. तौबा..."..
( मित्रांनो आपल्या आवडल्यास नक्की आपल्या मित्रांना पाठवा व प्रतिक्रिया अवश्य नोंदवा..)
लेखन डॉक्टर. सलीम सिकंदर शेख
बैतुशशिफा मल्टिस्पेशालिटी दवाखाना
श्रीरामपूर
मोबाईल 9271640014





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा