Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १६ मार्च, २०२६

फिनिक्स इंग्लिश स्कूल व जि.प गणेशगाव शाळेत अबॅकस मधील विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा उत्साहात

 उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी





फिनिक्स इंग्लिश स्कूल 25/4 लवंग व गणेशगाव जिल्हा परिषद शाळेतील,ज्युनियर व फर्स्ट लेव्हल अबॅकस यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


सातत्यपूर्ण सराव, एकाग्रता आणि चिकाटीच्या जोरावर विद्यार्थ्यांनी अबॅकसच्या पहिल्या स्तरात यश संपादन केले.

या यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आत्मविश्वास आणि आनंद पालक व शिक्षकांसाठी अभिमानाचा क्षण ठरला.

 

या प्रसंगी प्रमुख पाहुणे लवंग जि.प शाळेचे शिक्षक करीम  कोरबु सर,फिनिक्स स्कूल संस्थापक अध्यक्ष नूरजहाँ शेख, डॉ.युवराज सोलनकर ,रणजित चव्हाण,मोहसीन मुलाणी  शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेशगाव चे  सत्तार शेख ,महादेव मोरे , बालम शेख,हरून कोरबु 

उपस्थित होते


 मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विकास होऊन त्यांचा आत्मविश्वास अधिक बळकट होत असल्याचे मत प्रमुख पाहुणे करीम कोरबु सर यांनी व्यक्त केले.

 गणेशगाव जि.प.शाळेचे मुख्याध्यापक व्होनकडे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले  उपस्थितांचे आभार लवटे सर यांनी मानले .

हा कार्यक्रम फिनिक्स स्कूलच्या संस्थापक अध्यक्ष नूरजहाँ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा