Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १८ मार्च, २०२६

रमजान मुबारक 2026 रोजा नं. 29 वा गुरुवार दिनांक 19 -03-2026 इस्लाम !! " जो विवाह उत्तम आहेत, जो साधा असावा " प्रेषित मुहम्मद स्व. प्रबोधन.. "

 डॉ--सलीम साईदा सिकंदर शेख 

मिल्लतनगर,

अहमदनगर 

मोबाईल नं. 9271640014



इस्लाम मध्ये लग्न हें  बंधन नसून करार आहेत, एक सुखी व सुदृढ समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी एका स्त्री पुरुषाचा सामाजिक अधीमान्यता प्राप्त करार आहेत. इस्लामी विवाह पद्धतीच्या तीन अनिवार्य बाबी आहेत. 


सर्वात प्रथम मुला व मुलीची आपसात संमती असेल तर पुढील गोष्टी पुढे जातात. इस्लामने मुलीला आपल्या पसंतीचा पती निवडण्याचा अधिकार दिलेला आहेत. मुलीच्या राजी खुशिच्या संमती शिवाय झालेलं लग्न घटना बाह्य समजलं ठरवलें. तसेच मुलाला हीं आपली पत्नी निवडण्याचा अधिकार आहेत. मुलाने देखील संमती दयायला पाहिजेत. दोघांच्या संमती शिवाय इस्लाम मध्ये विवाह मान्य करत नाही. 

           #  कोणतेही आमिष दाखवून प्रलोभनें दाखवून किंवा धर्मांतर करून त्या निष्पाप मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून जबरदस्तीनें तिचे धर्मांतर करून विवाह करणे इस्लामी दृष्टीने निषेध निशिद्ध ठरवले आहेत. हराम ठरवले आहेत. हा विवाह इस्लामला कधीच मान्य नाही व नसतो. हें फार मोठं पाप इस्लाम समजतो.लग्ना अगोदर सम्बन्ध इस्लाम हराम समजतो इसलमाच्या दृष्टीने तो व्यभीचार पाप आहेत.असो.

           #   मुला मुलीची सहमती झाल्या नंतर उभय पक्षात झालेला विवाह लिखित स्वरूपात दोन साक्षीदारांच्या साक्षीने करार बदध करावा. तसेच वर मुलाने वधू मुलीला मेहेर ( स्त्री धन )दयावा. एवढ्या तीन अटी इस्लाम मध्ये अनिवार्य करून लग्न अत्यन्त साधे सोप्या करण्यात यावे असं प्रेषित मुहम्मद स्व नीं कळकळीनें सांगितलं आहेत.

       प्रेषित मुहम्मद स्व. सांगतात, " सर्वात बरकत वाला विवाह तो आहेत, जो विवाह अगदी साधा सोपा व कमी खर्चात व्हावा. "

दिव्य कुर आन सांगते, " त्या ( तुमच्या पत्नी ) तुमच्या पोशाखाप्रमाणे आहे आणि तुम्हीही त्यांच्या पोशाखा प्रमाणे आहे " ( सुरह 2, अल - बकराह आ. 187 ).पती पत्नीला पोशाखची उपमा यासाठीच की पती पत्नी एकमेकांचे संरक्षक आहेत, हें नाते जीवनातील पवित्र सौंदर्य प्रदान करणारे आहे.

प्रेषित मुहम्मद स्व  सांगतात, " लग्न झाल्या नंतर, पतीने आपल्या पत्नीचा तिरस्कार करू नयेत, जर तिची एखादी सवय तुम्हाला पसंत नसेल तर तिच्या अन्य सवयी पसंत असू शकतात, तसेच पती बाबतीत तहीं आहेत की तुम्ही त्याच्या काही चांगल्या सवयी असतील "( हादिस :- मुस्लिम शरीफ ).

              #   प्रेषित मुहम्मद स्व. नीं आपल्या उत्तरार्धात अंतिम हाज अदा केले त्या अंतिम हाज मधील जगप्रसिद्ध प्रबोधन केले,  " मित्रांनो ! पतीचे पत्नीवर काही हक्क आहेत, तसेच पत्नीचेहीं पातीवर अधिकार आहेत, आपल्या पत्नीने प्रेमाने व सहनुभूतीने वागवा. कठोर होऊ नका, दयाळू राहा, तुम्हीं ईश्वराच्या जामीनावर आपल्या पत्नीचा स्वीकार केलेला असतो 

म्हणून तुम्हीं अल्लाह समोर त्यांचा स्वीकार केलेला आहेत, हें खरे आहेत नां? मग अल्लाह ( परमेश्वर ) राच्या वतीने त्या तुमच्या कायदेशीर भार्या झालेल्या असतात. हीं गोष्ट कधीच विसरू नका. त्यांना त्यांचा वारस हक्क दया. " 

                         #   कबूल है कबूल है म्हटल्या नंतर निकाह  लग्न लागलं म्हणून सांगितले जातं हा काय प्रकार आहेत हें समजत नाही.,   #   काझी साहेब एक प्रकारे " प्रेषित मुहम्मद पैगंबर स्व.यांच्या काळातील प्रबोधनंत्मक  प्रवचन देतात त्याला " खुतबा ए निकाह " म्हणतात... त्याचं..

पवित्र कुरआन, " या अय्युहन्नासुत्तकू रब्बकुम मुल्ल- जी  खलक कुम मिन नप्सींव्वाहिदा..... रकीबा. ( सुरह नं. 04 आ नं. 01)

अर्थात :-हें मानवांनो! आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगा, ज्याने तुला एका जिवापासून निर्माण केले, आणि त्यातूनच त्याचे जोडपे निर्माण केले, आणि त्या दोघापासून असंख्य स्त्री व पुरुष निर्माण करून जगभर पसरवले, तर, अल्लाह चे भय बाळगा ज्याच्या नावाने तुम्हीं एकदुसऱ्या कडे ( आपल्या हक्काची )मागणी करता. आणि नात्याची बंधने पाळण्यासंबंधाने दक्ष राहा. आणि अल्लाह तुमच्यावर लक्ष ठेवून आहे.सुरह नं 04, अन - निसा आ. नं. 01).

पैगंबर प्रेषित मुहम्मद स्व. प्रत्येक विवाह प्रसंगी हें प्रवचन( खुतबा) करीत असत. हा एक महान उपदेश नव विवाहित व सर्वधर्मीय जोडप्यासाठी संपूर्ण मनाव जातीसाठी.! हो हा उपदेश कीं ज्याचे अनुपालन केल्यास खुद्द भगवंताने, साक्षात अल्लाह नें महान शास्वत यशाची हमी दिली आहेत, तिथे अभिप्रेत केवळ इहिक यशच नाहीं तर परलौकिक यश देखील आहेत, 

प्रवचनाची सुरुवात अल्लाहच्या, ईश्वराच्या अनंत कृपाची जाणीव ठेवून त्याच्या प्रति सदैव कृतज्ञ राहण्याच्या शिकवणीनें केली आहे. खरोखर भगवंताची, ( अल्लाह ) ची कृपा आपल्या प्रत्येकावर असंख्य अनंत व निरंतर आहेत त्याची उतराई कधीच करूच शकत नाहीत.

पवित्र कुरआन मध्ये अल्लाह म्हणतात कीं "धर्तीवरील समस्त समुद्रातील संपूर्ण पाण्याची शाई केली, ती आणखी सात पटीने पटीने वाढविली, व पृथ्वीवरील झाडा झुडपाची, वृक्षाच्या लेखण्या केल्या आणि अल्लाहच्या कृपाची नोंद करायचं ठरवले तरी ती शाई संपून जाईल आणि लेखण्याही संपतील मात्र अल्लाहच्या कृपाची नोंद शिल्लक राहील " सुरह नं. 18, सुरह कहफ आ. नं. 109).

विवाहच्या प्रसंगानुरूप अल्लाहच्या एका खास कृपेचा उल्लेख आहेत, ती आहेत मानवीजातीची जोडप्यात निर्मिती!, जोडपे वधू वराचे, पती - पत्नीचे, पत्नी विना पतीचे जीवन आणि पती विना पत्नीचे जीवन अपूर्ण आहे, एकांगी आहे, जोडीदाराविना जन्नत (स्वर्ग )देखील उदास आहे, यां खास कृपेची जाणीव पती पत्नीने सतत ठेवाव्यास हवी.

अल्लाह ची गुणगान, त्याची स्तुती,- हम्द  'अल्हमदु्लील्लाह " नें अर्थातच स्तुती केवळ अल्लाह ची आहेत, पवित्र कुर आन मध्ये, " अल्लाह तर एकच आहेत, निरपेक्ष! त्याला कोणाचीही गरज नाहीं, मात्र सर्वाना त्याची अंत्यन्त गरज आहेत, तों कुणाची संतती नाहीं  ना त्याची कोणी संतती आहेत, तों एकमेव आहेत, त्याच्या समान कोणीच नाहीं, ( सुरह इखलास नं. 112).

संत तुकाराम महाराज म्हणतात कीं, " कारे नाठविसी कृपाळू देवाशी!पोसितों जनासी एकला तों!, बाळा दुधा कोण करिते उत्पत्ती! वाढवी श्रीपति सवे दोन्ही!!"

अल्लाह चे गुणगान कृतज्ञता सह सर्व पैगंबरा विषयी आदरभाव व्यक्त केल्यानंतर सर्व उपस्थित्यांना विश्व बंधुत्वाचा समतेचा महान संदेश देण्यात आला आहेत, ज्याची आज आपल्या देशासह संपूर्ण जगाला नितांत आवश्यकतां आहेत." लोकांनो! तक्ववा अंगीकार, ईश्वराचे भय बाळगा, त्या एकमेव अल्लाह चे ज्याने एकाच आदम पासून तुमची निर्मिती केली, आदम पासून त्याची सहचरणीं बनवली व या एकाच जोडप्यापासून समस्त पुरुष व समस्त स्त्रीयांची निर्मिती केली " सुरह हुजूरत 49 आ. नं 13 वी,) संपूर्ण सृष्टी निर्मिती ही एकाच मायबाप ची असल्यामुळे संपूर्ण मनाव जातीत विश्व बंधुतुल्य नाते आहेत. समस्त मानवाजता एक समान आहेत,कोणीही श्रेष्ठ नाहींत व कोणीही कानिष्ठ नाहीं, आणि हिच समतेची व बंधुत्वाची भूमिका स्पष्ट करताना संत तुकोबा महाराज म्हणतात कीं, "अवघी एकाचीच वीण तेथे केचे भिन्न भिन्न!!" पुन्हा तुकोबा महाराज म्हणतात कीं,"!!भेदाभेद भ्रम आमंगळ!!" हिच पवित्र कुराण, पैगंबर, तुकोबा राया यां सर्वांची भूमिका आधुनिक विज्ञानाणे ही सिद्ध केली आहेत. आज आपण रक्त दान करतोय, अवयव दान करतोय, हिंदू चे रक्त मुसलमान घेतोय व मुसलमानाचं रक्त हिंदू घेतोय यां मुळे दोघांचं ही जीवदान होतं, अर्थात आजच्या विज्ञानाणे समस्त मनाव जातीचे रक्ताचे नाते असल्याचे सिद्ध केले आहेत. खरे तर धर्म माणसं जोडण्यासाठी आहेत. तों तोडण्यासाठी कधीच नव्हता व नाहीं सुद्धा,!जो जोडतो तों धर्म!सध्या काही विघातक शक्ती आप आपसात द्वेष पसरविण्याचे, आग लावण्याचे काम करत आहेत, धर्मा धर्मात विनातूस्ट अनत आहेत जातीय तेढ निर्माण करून आपलं राजकीय इस्पित सध्य करीत आहेत. आपण सर्व धर्म जोडण्याचं काम अधिक जोमाने मनाने करू, आपण आपलं काम फक्त्त चिमणी च्या चोचि मध्ये जेवढं पाण्याचे थेंब बसतील एवढं जरी काम केलं तरी आपलं काम आग विझवीन्यर्याय येईल.

" इन्ना अकमकुम इदल्लाही अत्तकाकूम " तुम्हा लोकांपैकी श्रेष्ठ तों आहेत जो तक्ववा, चरितऱ्याने अर्थात शिलाने श्रेष्ठ असेल.. ( सुरह हुजूरत 49, आ. नं. 13 वी,).

अशीच कुरानातील भूमिका स्पष्ट करतांना गौतमबुद्ध म्हणतात, " जन्माने वा वर्णनाणे नव्हे, तर, शिलाने आणि प्रज्ञनेने मनुष्य श्रेष्ठ होतो ".

                यां नंन्तर अल्लाहने वधू वरां सह सर्वाना आज्ञा केली आ

हे कीं, " "वत्तकुल्लाह ल्ललजी तसा आलुन बिही वल अरहम " अर्थात :- यां विवाहमुळे जें नातेसंबंध प्रस्थापित होत आहेत त्याची निगा राखा! यां नाते संबंधांना तडा जाऊ देवू नका.

"    इन्नाल्लाह कान अलैकुम रकिबा  "

हें जरूर लक्षात दया कीं अल्लाह परमेश्वर प्रत्येक क्षना क्षना ला तुम्हाला बघत आहेत. हें जग अंधेरी नगरीं चैपट राजा नव्हे. काही लोकांचा गैरसमज आहेत कीं आम्हाला काही ही करो आम्हाला कोणीच बघत नाहीं परंतु परमेश्वर अल्लाह चा सीं सीं टीव्ही तुम्हाला कायम स्वरूपात पाहत आहेत. आणि खबरदार, गाठ शेवटी अल्लाह शीच आहेत,

#"  वला तमुतूंन्न इल्ला व अंतूम मुस्लिमिन "#

शेवटच्या स्वासा पर्यंत, मृत्यु येयीपर्यंत अल्लाह चे पालन करा.

              #" व ईजल मौउदतु सुईलत,! बि आययी जंब्बीन कुटीलत!!"#

अर्थातच :-# क्या बितेंगी उस दिन, जब हम इन जिंदा गाड दी गयी बच्चीयों से पूछे गें उन्हे किसने और किस जुर्मं में हलाक किया गया?? "#

पैगंबर मिळण्या अगोदर अरब मध्ये जिवंत मुली गडल्या जायच्या व आज काल गर्भ लिंग करून मुली माहित झाल्यावर त्या आईच्या पोटातच मारल्या जातात म्हणून अल्लाह जवळ त्या आई बाबा, सो्नॉलॉजिस्ट, संबंध सर्वाना कायमतच्या दिवशी विचारलं जाईल कीं त्या मुलींचे काय द्वेष होता?? तुम्ही काय उत्तर देताल??.

" हुंडा घेणं व हुंडा देणं दोन्हीही इस्लाम मध्ये अपराध आहेत..

यामुळे हजारो मातापिता वर शेती विकून हजारो लाखों रुपये कर्ज बाजरी झाले आहेत, 

पैगंबर मुहम्मद स्व. म्हणतात की ," हें जग मारणोत्तर जीवनाची शेती आहेत "

# संत कबीर म्हणतात की, " बीज बोये बभूल के आम कहां से पाये "#

संत तुकाराम महाराज म्हणतात की, " पेरी कडू जिरे, मागे अमृत  फळे अर्के वृक्षा केळी कैसे येती "

अर्थातच :-यां दुनेंयत तु आला चांगले पेरण्यासाठी, मेहनत, मशागत करण्यासाठी म्हणून जें पेरशील तेच उगवेल.. म्हणून पर लौकिक जीवनात पण तेच उगवेल.

पुन्हा पैगंबर मुहम्मद स्व. सांगतात की,अल्लाह चे भय बाळगा, सत्य बोला, रास्त तेच बोला, खरे बोला, चहाडी करू नका, निंदा नलस्ती करू नका, आपल्या जिभेवर नियंत्रण राखा, सांभाळून बोला, पैगंबर यांची आज्ञा पाळा सर्व उपदेशचे पालन करा "

# यांनतर शेवटी पैगंबर प्रबोधनात सांगतात की , "आन - निकाह मिन सुन्नती "

अर्थातच :- निकाह विवाह करणे ही सुद्धा एक उपासना - बंदगी - इबादत - पुजा -  सुन्नत आहेत. संसार करणे, मुलां बाळंचं संगोपन पालन पोषण करणे, माता पित्या ची भावाबहिणीची, सेवा करणे हें सुद्धा परमार्थ च आहेत परमार्थ.. ती सुद्धा एक उपासना - इबादत - बंदगी प्रार्थना आहेत यां लहानशा पैगंबर मुहम्मद स्व. च्या प्रबोधनानं मत्मक उपदेशाने उपासनेची इबादत बंदगी, पूजेची व्याख्याच बदलून टाकली. माणसाचं संपूर्ण जीवनातील प्रत्येक काम ही भक्ती व उपासनाच आहेत. तुमच्या कष्ताच्या घामाच्या पैशाने इमाने इतबारे कामवून मुला बाळांना पालन पोषण करणे सुद्धा उपासना आहेत.#

# म्हणून संत तुकाराम महाराज सांगतात की, " जिडोनिया धन उत्तमची व्यवहारे, उदास विचारे वेच करी "#

# माता पित्याची सेवा ही इबादत बंदगी सेवा, ही महान सेवेत येते, " माँ के कदमों के नीचे जन्नत है " माँ बाप ही तेरी जन्नत है, और माँ बाप ही 'तेरी जहाँननुम है " आई वडिलांची सेवा करून स्वर्गात जा.#

#संत तुकाराम महाराज म्हणतात की, " माय बापे केवळ काशी " तेणे नव जावे तीर्थाशी!, तुका म्हणे मायबापे! अवघी देवाची स्वरूपे "

शेवटी पैगंबर मुहम्मद स्व. नांव दापांत्यांसाठी दुआ प्रार्थना करतात की,#

(#बारकल्लाहुं लक व बारक अलैकुमा व जमाआ बैनकुमा फि खैर ( तिर्मिझी )#

अर्थातच :- " अल्लाह तुमच्या वैवाहिक जीवनात भरपूर बरकत देवो, तुम्हा उभयतांवर आपल्या कृपाची निरंतर वर्षाव करो आणि तुम्हा उभयतांना अंत्यन्त प्रेमाने व विचाराने आदर्शवत संसार करण्याची सद्बुद्धी देवो. "

मित्रांनो लेख आवडला तर आपल्या मित्र व नातेवाईकांना जरूर पाठवा..



लेखक :- डॉक्टर, सलीम साईदा सिकंदर शेख 

बैतुशशिफा मल्टिस्पेशालिटी दवाखाना 

मिल्लतनगर,

अहमदनगर 

मोबाईल नं. 9271640014

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा