Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १८ मार्च, २०२६

*संजय सिरसाठ यांना समाजकल्याण मंत्रीपदावरून तातडीने हटवा* *अट्रॉसिटीबाबत बेकायदा विधान खपवून घेतलं जाणार नाही --- साहेबराव वाघमारे*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*


-अन्याय अत्याचाराची पडताळणी करून अट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवा असे बेताल भाष्य करणारे समाजकल्याण मंत्री संजय सिरसाठ यांना समाजकल्याण मंत्री पदावरून तातडीने हटवा आशी मागणी करमाळा युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साहेबराव वाघमारे यांनी केली.


या बाबतीत साहेबराव वाघमारे यांनी सांगितले की संजय सिरसाठ यांनी आजवर समाजकल्याण निधी ची वाट लावली आहे आणि आता थेट अट्रॉसिटी कमकुवत करत आहेत हे नाटकं कोणीही खपवून घेणार नाही. संसदेत दुरुस्ती करून १८-ए कलम लागू आहे याचं भान ठेवा त्यानुसार तात्काळ अटक करण्याचे प्रावधान आहे. याची अंमलबजावणी करायचं सोडून अन्याय अत्याचाराची पडताळणी करण्याचा निर्णय घेऊन पीडिताच्या जखमेवर मीठ लावणायचं काम केलं गावातील मुख्य परिस्थिती काय AC रुम मध्ये बसुन समजणार मंत्री महोदय तुम्ही हवेतील माणसे जमिनीवर गावात आजही अन्याय अत्याचाराला बळी कुटुंब जातात राज्यातील कोणत्या जिल्हय़ात तालुक्यात जातीयवाद होतोय हे माहीत आहे का तुम्हाला गावात दलित समाजातील मयताला अंत्यसंस्कार, सार्वजनिक पाणीपुरवठा, गावातील ग्रामदैवत मंदिरात प्रवेश नाकारणे दलित समाज वाळीत टाकणे, भटके विमुक्त जाती पारधी समाजाच्या झोपड्या जाळणे, एक ना एनेक समस्या आहे. तुम्ही दलित आहे का उच्च वर्णीय आहे हे बहुजन समाजाला समजेना. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या उपकार हे विसरू नका. मंत्री आज आहेत. उद्या नसणार हे नक्की आहे तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा आम्ही समाज बांधव जाहीर निषेध करतो..समाज हे खपवून घेणार नसल्याचं सांगत संजय शिरसाठ यांची तातडीने हकालपट्टी करा नसता तीव्र निषेध आंदोलन करू असा इशारा सर्व समाज रस्त्यावर उतरून तीव्र स्वरुपात आंदोलन करू ते जातीयवादी सरकारला परवडणारे नाही करमाळा युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साहेबराव वाघमारे यांनी मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनात सांगितले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा