Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २३ मार्च, २०२६

*बाभुळगाव ता. माळशिरस येथील एकनाथ पराडे पाटील यांना महाराष्ट्र* शासन सामाजिक व *न्याय विभागांचा* *राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर*

 उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी



बाभुळगाव ता.माळशिरस येथील शिवपार्वती माध्यमिक विद्यालय ,बाभुळगाव चे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते एकनाथ पराडे पाटील यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक व न्याय विभागांतर्गत देण्यात येणारा २०२४-२५ चा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात या पुरस्कारासाठी निवड झालेले ते एकमेव व्यक्ती ठरले आहेत.

गेल्या ३० वर्षांपासून ते माळशिरस तालुक्यात सामाजिक कार्य करत असून, गुरूजनांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत. बाभुळगाव परिसरात त्यांनी व्यसनमुक्ती चळवळीला विशेष चालना दिली आहे. व्यसनमुक्ती युवक संघाच्या माध्यमातून गेली २० वर्षांपासून दारूबंदी, जनजागृती व समाजप्रबोधनाचे काम सातत्याने सुरू आहे. तसेच वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे आणि व्यसनमुक्ती मोहिमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.

त्यांनी माळशिरस तालुका व्यसनमुक्ती युवक संघाचे अध्यक्ष म्हणूनही काही वर्षे कार्यभार सांभाळला आहे. गावात त्यांच्या मार्गदर्शनाखाली बंडातल्या कराडकर यांच्या प्रेरणेने गेल्या १५ वर्षांपासून दररोज महादेव मंदिरात हरिपाठ असतो. दर सोमवारी महाप्रसाद असतो. पुढील सहा ते सात महिन्यांच्या महाप्रसादाच्या पंगती बुकिंग आहेत.

या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन शासनाने त्यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा