अकलूज प्रतिनिधी
केदार लोहकरे
टाइम्स 45 न्यूज मराठी
नवी पिढी आणि थोर मराठी नाट्य परंपरा यांचा दुवा साधण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई शाखा: अकलूज यांच्या वतीने 'शाळा-कॉलेज तिथे नाटक' हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. या महत्त्वाकांक्षी मोहिमेचे संपूर्ण नियोजन आणि वेळापत्रकाची माहिती सौ शितलदेवी धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये नाटकाची गोडी निर्माण करणे आणि त्यांच्यातील सुप्त अभिनय गुणांना व्यासपीठ मिळवून देणे हा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांचे लाभणार सहकार्य कोल्हापूरचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय हळदीकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण उपक्रम साकारला जात आहे. त्यांना नागनाथ साळवे,सुरज ननवरे,सयाजी मगर आणि मोतीराम वाघमोडे यांचे तांत्रिक सहकार्य लाभणार आहे.
*पाच दिवसांचे सविस्तर उपक्रमाचे वेळापत्रक:*
२४ मार्चपासून या उपक्रमाची सुरुवात होत असून त्याचे नियोजन खालीलप्रमाणे असेल:
□ २४ मार्च: सकाळी ९:०० वाजता जिल्हा परिषद किल्ला शाळा (अकलूज), सकाळी १०:०० वाजता जि. प. शाळा (शंकरनगर) आणि सकाळी ११:३० वाजता शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूल (शंकरनगर)
□ २५ मार्च: सकाळी ९:३० वाजता जि. प. शाळा (कचरेवाडी) आणि सकाळी ११:०० वाजता शंकरराव मोहिते महाविद्यालय (अकलूज)
□ २६ मार्च: सकाळी ९:३० वाजता गुरुकुल (अकलूज)
□ २७ मार्च: सकाळी ९:०० वाजता जि.प.शाळा अकलूज (२१ खोल्या) आणि सकाळी १०:३० वाजता जि.प.शाळा (तरंगफळ)
□ २८ मार्च: मोहिमेच्या शेवटच्या दिवशी सकाळी ९:०० वाजता माढा कॉलेज (माढा) आणि सकाळी ११:०० वाजता यशोदा गुरुकुल (अरण) येथे प्रयोगांचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे मार्गदर्शन लाभले असून प्रत्यक्ष नियोजन आणि संकल्पना आणि यशस्वी आयोजनासाठी अजय तपकिरे,सुनील कांबळे,अमित पुंज, औदुंबर भिसे आणि डाॅ.विश्वनाथ आवड हे परिश्रम घेत आहेत.
*चौकट*
"नाट्य संस्कृतीचा वारसा जपणे ही काळाची गरज असून,या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधून भविष्यातील उत्तम कलाकार घडू शकतील," असा विश्वास शितलदेवी धैर्यशील मोहिते पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. या उपक्रमाला विद्यार्थ्यांसह पालकांनीही मोठ्या संख्येने प्रतिसाद द्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा