Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १ मार्च, २०२६

इंदापूर महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त ११४ संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण, वैज्ञानिक दृष्टिकोन ही सुखी जीवन जगण्याची आदर्श गुरुकिल्ली : प्राचार्य डॉ. जीवन सरवदे.

 इंदापूर, डॉ. संदेश शहा.

टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९





इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, इंदापूर येथे दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा या उद्देशाने संशोधन प्रकल्प सादरीकरण स्पर्धेचे यानिमित्त आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील सर्व विभागांतील २२२ विद्यार्थ्यांनी एकूण ११४ संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण केले. प्रत्येक शाखेतून उत्कृष्ट तीन स्पर्धकांची निवड करण्यात आली असून  सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे


या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे, उपप्राचार्य

 प्रा. दत्तात्रय गोळे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. शिवाजी वीर, कला शाखाप्रमुख डॉ. भरत भुजबळ, संशोधन समिती प्रमुख डॉ. राजेंद्र भोसले, मूल्यांकन व मानांकन समन्वयक डॉ. सुरेंद्र शिंदे, सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्राचार्य डॉ. जीवन सरवदे म्हणाले, “विज्ञान हे केवळ विषय नसून जीवन जगण्याची आदर्श पद्धत आहे. प्रश्न विचारण्याची वृत्ती आणि शोध घेण्याची जिज्ञासा जपली तरच खरा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो. विद्यार्थ्यांनी संशोधनाच्या माध्यमातून समाजातील समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करावा.”


अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. शिवाजी वीर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

स्पर्धेसाठी प्रा. विरेश होळकुंदे, डॉ.आत्माराम फलफले, प्रा. योगेश झगडे, प्रा. दिनेश जगताप, प्रा. दिव्या जाधव, प्रा. स्वाती राऊत व डॉ. तानाजी कसबे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रा. आकिन कांबळे, प्रा. सद्दाम पटेल, प्रा. दर्शन दळवी व डॉ. महम्मद मुलानी यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन खरात यांनी केले तर आभार प्रा. दिनेश जगताप यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा