*तुळजापूर तालुका,प्रतिनिधी-- *--चांदसाहेब शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
तुळजापुर तालुक्यातील मौजे मंगरुळ येथील अंगणवाडी शिक्षिका रुकूमबी इमाम शेख यांची मुलगी व धाराशिव तालुक्यातील अंबेजवळगे येथील अरबाज पठाण यांची पत्नी मेहर हिची पोलिस दलात निवड झाली असून त्याने जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर हे यश संपादन करून धाराशिव पो-लीस दलात कॉन्स्टेबलपदी निवड झाली आहे. मेहर पठाण(शेख) यांचा जन्म तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथे झाला. मेहर इमामपाशा शेख हे त्यांचे माहेरचे नाव. २१ फेब्रुवारी २०२१ ला धाराशिव तालुक्यातील अंबेजवळगा येथील अरबाज पठाण यांच्याशी त्याचा विवाह झाला पती अरबाज पठाण शेती काम करतात त्यांना आरहान हा २वर्षाचा मुलगा आहे. मेहर यांनी प्राथमिक शिक्षण मंगरूळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तर माध्यमिक शिक्षण धाराशिव येथील श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये पूर्ण केले. धाराशिव येथील सह्याद्री करिअर अकडमी येथे १० ऑगस्ट २०२५पासून त्या प्रशिक्षण घेत होत्या. सातत्याने अभ्यास व सराव
सासू दिर सुरु ठेऊन वयाच्या २२व्या वर्षी त्यांनी हे यश संपादन केले. आई रुकुमबी, वडील इमामपाशा आणि लग्नानंतर पती आरबाज ,सबीयाबी, सासरे हुसेन अजहर या सासर कडील मंडळीनी त्याला वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य केले व कायम सोबत राहिले त्यांच्यामुळेच हे यश संपादन केल्याचे मेहर पठाण सांगतात. त्यांच्या या यशाबद्दल कुटुंबीय, नातेवाईक,सासर व माहेर कडील ग्रामस्थांकडून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव केला जात आहे
"""""""""""""""""""""""""""""""
*चौकट*
*सातत्यपूर्ण अभ्यास, नियमित व्यायाम व जिद्द, चिकाटी व अथक परिश्रम घेतल्यास हमखास यश मिळते माझ्या या संपूर्ण यशाचे श्रेय माझ्या सासरच्या व माहेरच्या मंडळीसह कुटुंबीय यांचे आहे -मेहर पठाण (शेख)*
"""""""""""""""""'"""""""''"""'""""""





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा