Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २७ मार्च, २०२६

*५१ शादीयांच्या नावनोंदणी साठी २८मार्च पासून सुरवात*..... *“हजरत ख्वाजा शामशुद्दीन गाजी रहे वेल्फेअर सोसायटीतर्फे सामूहिक विवाह सोहळ्याचे १८ वे वर्ष*

 *उस्मानाबाद (धाराशिव). प्रतिनिधी *--चांदसाहेब शेख* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी*



धाराशिव (उस्मानाबाद) शहरात सामाजिक एकोप्याचा आणि साधेपणाचा संदेश देणारा भव्य सामूहिक विवाह सोहळा (५१ शादीयां) यंदा १८ व्या वर्षी आयोजित करण्यात आला आहे. हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी वेलफेअर सोसायटी यांच्या वतीने दरवर्षी हा विवाह सोहळा आयोजित केला जात असून, यंदाही तो मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. 


हा सामूहिक विवाह सोहळा १९ एप्रिल २०२६ (रविवार) रोजी गाजी मैदान, दारुल उलूम शम्सिया, धाराशिव येथे होणार आहे. इस्लामी दिनदर्शिकेनुसार १ जिलकद १४४७ हिजरी रोजी  विवाह विधी पार पडतील


या उपक्रमाचे प्रमुख आयोजक मा.नगरसेवक सय्यद नादेरुल्लाह हुसेनी (सर) असून, गेल्या १८ वर्षांपासून सातत्याने हा उपक्रम राबविला जात आहे. समाजातील गरजू कुटुंबांना दिलासा देत विवाह सोहळा साधेपणाने पार पाडण्याचा यामागील मुख्य उद्देश आहे.

कार्यक्रमासाठी इच्छुक जोडप्यांची नोंदणी २८ मार्च २०२६ पासून सुरू होणार असून १२ एप्रिल २०२६ पर्यंत चालणार आहे, असे आयोजकांनी कळविले आहे. विवाहासाठी आवश्यक कागदपत्रे, अटी व नियम याबाबत मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


या सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या जोडप्यांसाठी काही अटी व मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. अनावश्यक खर्च टाळून साधेपणाने विवाह पार पाडण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून नवदांपत्यांना आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा