Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २८ मार्च, २०२६

युवा पत्रकार विजय निकत यांना राष्ट्रीय आदर्श पत्रकार पुरस्कार बहाल

 *आलिमभाई.  शेख*

*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*



राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मिडिया समूह यांच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय आदर्श पत्रकार पुरस्कार दैनिक "जनसत्य" चे युवा पत्रकार विजय भानुदास निकत यांना मिळाला असून दरवर्षी राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाकडून राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविले जाते सदरचा पुरस्कार  एस.फोर.जी हॉटेल थेऊर फाटा पुणे येथे भुमता ब्रिगेडच्या महाराष्ट्र अध्यक्षा तृप्तीताई देसाई यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँगेसचे प्रांतिक सदस्य ऍड.महेशदादा देवकाते अभिनेत्री भारती जीभकाटे,अभिनेत्री रिया खुरपडे अभिनेत्री भक्ती परदेशी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मिडीयचे संपादक राहुल कुंदनर पुणे जिल्हा प्रतिनिधी संतोष भरणे व विविध मान्यवर यांच्या उपस्थित बहारदार कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विजय निकत हे गेली वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून विश्वसहारा समाजसेवा संस्थेच्या माध्यमातून ग्रंथालय चळवळ,शिक्षण,यासारखे विविध उपक्रम राबवतात त्यांच्या कार्याची दखल घेऊन आजपर्यंत त्यांना विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत त्यांच्या या निवडीचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा