Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २८ मार्च, २०२६

नरसिंहपूर येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन नामदेव सरवदे यांची ऑल इंडिया पॅथर सेनेच्या इंदापूर तालूका अध्यक्षपदी नियुक्ती

 *कार्यकारी संपादक*

*एस. बी. तांबोळी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-8378081147*



-----नरसिंहपूर येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन नामदेव सरवदे यांची ऑल इंडिया पॅथर सेनेच्या इंदापूर तालूका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांना महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बाळासाहेब शेंडगे यांनी नियुक्तीचे पत्र दिले आहे.

    सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेत समाजहितासाठी सातत्याने कार्यरत राहत असल्याने आपल्या कार्याची राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी दखल घेत आपली इंदापूर तालूका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असल्याचे नितीन सरवदे यांच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

    नितीन सरवदे यांनी बोलताना सांगितले, मला जी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे त्याला साजेसे असेच काम करणार आहे. संघटनेच्या माध्यमातून समाजातील शोषीत, पिडीत, गरीब, गरजू व वंचितांना योग्य तो न्याय देण्यासाठी झोकून देऊन काम करणार आहे. तसेच सामाजिक एकोपा व न्याय प्रस्थापित करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत राहणार आहे.

फोटो - नितीन नामदेव सरवदे.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा