*कार्यकारी संपादक*
*एस. बी. तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8378081147*
छत्रपती संभाजी महाराज बलिदान व जागतिक महिला दिनानिमित्त महिलांची रक्तगट तपासणी व रक्तदान शिबीराचे आयोजन राजेंद्र बळवंतराव व मित्र परीवार यांच्या वतीने करण्यात आले. यामध्ये ६१ रक्तदात्याने रक्तदान केले.
नीरा नरसिंहपूर येथील नरसिंहराज मंगल कार्यालयात राजेंद्र बळवंतराव व मित्र परीवार यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंचायत समिती सदस्य शिवाजी मोहिते, ज्योतीषाचार्य राजेश बादले पाटील, डॉ. पराग अवचट, डॉ. अर्जुन शिंदे, डॉ. मिटकल, डॉ. सुमित्रा कोकाटे मॅडम, डॉ. सिद्धार्थ सरवदे, आशासेविका अश्विनी देवळे, सौ देशमुख मॅडम, नितीन सरवदे, नरहरी काळे, आनंद काकडे, जगदीश सुतार, नाथाची माहिती, संतोष मोरे, आबासाहेब पावशे, दत्तात्रय कोळी, स्वप्निल चव्हाण, ओंकार कोळी, बच्चन सरवदे, अमर भोसले, धनंजय दुनाखे सर, रविराज काकडे, सचिन कदम, गौरव दंडवते, अतुल भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
नरसिंहराज मंगल कार्यालयात रक्तदान व तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. मुक्ताई ब्लड बॅक इंदापूर यांच्या वतीने रक्तसंकलन करण्यात आले. रक्तदात्याला प्रमाणपत्र, हेल्मेट किंवा पाण्याचा जात देण्यात आला.
फोटो - नीरा नरसिंहपूर येथील नरसिंहराज मंगल कार्यालयात रक्तदान शिबीराचा शुभारंभ करताना दिसत आहेत.
---------------------------






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा