Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १३ मार्च, २०२६

*जीसीसी टीबीसी परीक्षेत कोमल गोसावी ९९% गुण मिळवून सोलापूर* *जिल्ह्यात द्वितीय व माळशिरस तालुक्यात प्रथम, मल्हार* *कुदळे द्वितीय व निर्जरा* *माने तृतीय* *अंध विद्यार्थी जिब्रान तांबोळी याचे ९५% ग्रुण प्राप्त करत उल्लेखनीय यश* *भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट अकलूजच्या विद्यार्थ्यांचे उज्वल यश*

 *मुख्य संपादक*

        *टाइम्स 45 न्यूज मराठी* 

   ‌.            *मो:-9730867448*




अकलूज (वार्ताहर) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे वतीने जानेवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय जीसीसी-टीबीसी परीक्षेचा निकाल नुकताच ऑनलाईन जाहीर झाला. या परीक्षेमध्ये भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट, अकलूज या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश प्राप्त केले. 

संस्थेतील कोमल प्रभाकर गोसावी हिने इंग्रजी ३० शब्द प्रति मिनिट स्पिड या विषयात ९९% गुण प्राप्त करत सोलापूर जिल्ह्यामध्ये द्वितीय क्रमांकाचा तर माळशिरस तालुक्यामध्ये प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला. मल्हार नितीन कुदळे याने इंग्रजी ३० स्पीड मध्ये ९८%  गुण प्राप्त करत तालुक्यात द्वितीय तर निर्जरा रमेश माने हिने याच विषयात ९७% गुण प्राप्त करत तृतीय क्रमांकाचा बहुमान प्राप्त केला.

विशेष बाब म्हणजे संपूर्णतः अंध विद्यार्थी जिब्रान जावेद तांबोळी याने इंग्रजी ३० स्पीड विषयात ९५% व इंग्रजी ४० स्पिड विषयात ८६% गुण प्राप्त करत विशेष उल्लेखनीय यश प्राप्त केले. परीक्षेमध्ये त्यास वाचनकर्ता म्हणून प्रतीक होनमाने याचे विशेष सहकार्य लाभले. भक्ती संस्थेच्या विद्यार्थ्यांनी यशाची उज्वल परंपरा कायम ठेवत घवघवीत यश संपादन केले आहे.

विषयानुसार संस्थेतील प्रथम तीन क्रमांक मिळवलेले विद्यार्थी :-

इंग्रजीत ३० श.प्र.मि. स्पीड  या विषयात - गोसावी कोमल प्रभाकर ९९% प्रथम, मल्हार नितीन कुदळे ९८% द्वितीय, निर्जरा रमेश माने ९७% तृतीय.  मराठी ३० श.प्र.मि. या विषयात :- सौरभ लक्ष्मण कोळेकर ९६% प्रथम, श्रद्धा उमेश गवसणे ९४.५% द्वितीय, रणजीत रघुनाथ चव्हाण ९४% तृतीय. इंग्रजी ४० श.प्र.मि. या विषयात :- निर्जरा रमेश माने ९३.५% प्रथम, सुशांत हरिदास वगैरे ९२.५% द्वितीय, ज्ञानेश किशोर कटके ९२% तृतीय.

हिंदी ३० श.प्र.मि. या विषयात ज्ञानेश किशोर कटके याने ९५% गुण प्राप्त करत विशेष यश संपादन केले. 

या परीक्षातील स्पीड विभागामध्ये आरती नलवडे, कोमल गोसावी, मल्हार कुदळे, स्नेहल चमरे, तेजश्री गमे, विठ्ठल देवकते यांनी ४० पैकी ४० गुण प्राप्त करत विशेष प्राविण्य मिळविले तर पत्रलेखन, तक्ता व ईमेल लेखन या विभागामध्ये ज्ञानेश कटके, प्रियंका होनमाने, विशाल खंडागळे, जिब्रान तांबोळी, अंकिता कदम, सौरभ कोळेकर, मल्हार कुदळे, प्रसाद शिंदे यांनी ३५ पैकी ३५ गुण प्राप्त करत विशेष प्राविण्य मिळविले व वस्तुनिष्ठ प्रश्न विभागामध्ये कोमल गोसावी व हिंदवी थिटे यांनी २५ पैकी २५ गुण प्राप्त करत विशेष प्राविण्य प्राप्त केले. संस्थेतील ७७ विद्यार्थ्यांनी 'ए प्लस' श्रेणी व १९ विद्यार्थ्यांनी 'ए' श्रेणी प्राप्त केलेली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत विविध शासकीय विभाग, निमशासकीय, महामंडळे, सहकारी संस्था विभाग, न्यायालय आदींमध्ये लिपिक (क्लार्क) पदांच्या भरतीसाठी जीसीसी टीबीसी मराठी व हिंदी ३० व ४० शब्द प्रति मनिट या विषयांचे व इंग्रजी ३०,४०,५० व ६० श.प्र.मि. या विषयांचे कोर्सेस महाराष्ट्र व गोवा राज्यातील शासनमान्यता प्राप्त संस्थांमधून चालविले जात असून परिषदेमार्फत वर्षातून दोनदा या परीक्षा घेतल्या जातात व या परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी लिपिक पदांच्या भरतीसाठी पात्र ठरतात. 

जानेवारी २०२६ मधील जीसीसी-टीबीसी परीक्षेत दैदीप्यमान यश प्राप्त केलेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे प्राचार्य गजानन जवंजाळ, नितीन दुरणे, किरण भगत, ज्ञानदीप जवंजाळ व प्रज्ञा गायकवाड यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. उज्वल यश प्राप्त करत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि विशेषतः अंध विद्यार्थी जावेद तांबोळी याचे सर्व स्तरावरून कौतुक होत असून संस्थेच्या वतीने प्राचार्य गजानन जवंजाळ यांनी त्यांचे अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा