*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
. *मो:-9730867448*
राज्यातील नगरपालिका / नगरपरिषदा व नगरपंचायत क्षेत्रामध्ये अनेकवेळा कराची थकबाकीची रक्कम जास्त असणे, मालमत्ता धारकांची आर्थिक अडचण असणे या व इतर कारणांमुळे मालमत्ता कराचा भरणा करण्यात येत नाही. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १५० (अ) (१) नुसार बिलाच्या न भरलेल्या रकमेवर संबंधित नगरपरिषद / नगरपंचायत यांचेकडून दरमहा २% शास्ती लावण्याचे प्रावधान आहे. यामुळे मालमत्ता धारकाच्या एकूण थकबाकीमध्ये वाढ होऊन याचा विपरीत परिणाम करवसुलीवर होतो. यावर उपाययोजना म्हणून नगरपरिषद क्षेत्रातील मिळकत धारकांकरिता दि. १९/०५/२०२५ रोजी महाराष्ट्र शासनाने मालमत्ता करावरील शास्ती माफ करणेकामी अभय योजना प्रोत्साहनात्मक राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सदर योजनेमध्ये दि. १९/०५/२०२५ रोजी ज्या मिळकतधारकांची शास्ती थकित आहे, अशा मिळकतधारकास महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती अधिनियम १९६५ चे कलम १५० (अ) नुसार नगरपरिषद मालमत्ता करावर आकारण्यात आलेली शास्ती दिनांक १९/०५/२०२५ अखेर माफ करण्यासाठी मिळकतकराची पूर्ण रक्कम भरुन विहीत नमुन्यात अर्ज सादर करु शकतील.
१. अभय योजना एकदाच लागू आहे.
२. दिनांक १९/०५/२०२५ पर्यंतच्या थकित मालमत्ता कराच्या रक्कमेवरील फक्त शास्तीस अभय योजना लागु आहे.
३. अभय योजना थकित मालमत्ता कर वसुलीसाठी प्रोत्साहनपर आहे.
४. जे मिळकत धारक शास्ती वगळता इतर थकित मालमत्ता कराची संपूर्ण रक्कम दिनांक ३१/०३/२०२६ पूर्वी भरणा करतील त्याच मालमत्ताधारकांना सदर अभय योजना लागू राहील.
५. सदर योजनेचा लाभ देण्याकामी नगरपरिषदेकडे मिळकतधारकांनी प्रस्ताव / विहीत नमुन्यात अर्ज देणे आवश्यक आहे.
६. जे मिळकतधारक अभय योजनेचा लाभ घेवू इच्छितात अशांकडून विहित नमुन्यात, सवलत मागणी करिता परिपूर्ण प्रस्ताव नगरपरिषदेकडे सादर करावा लागेल. विहीत नमुना नगरपरिषदेच्या कार्यालयात उपलब्ध असून त्या नमुन्यात अर्ज सादर करावा.
७. दि. १९/०५/२०२५ नंतरच्या थकबाकी शास्तीस अभय योजना लागु राहणार नाही.
८. प्रस्ताव सादर करताना आधारकार्ड छायांकित प्रत, मालमत्ता कराच्या मागणी विलाची छायांकित प्रत व संपूर्ण कराची रक्कम भरलेल्या पावतीची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
तरी थकित शास्ती वगळता मालमत्ता कराची रक्कम दिनांक ३१/०३/२०२६ च्या आत भरुन शास्ती माफी करिता अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करणेत येत आहे.
*सचिन पाटील
मुख्याधिकुम्मी (निवड श्रेणी-अ,) अकलूज नगरपरिषद, अकलूज





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा