उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागातील अकलूज-टेंभुर्णी रोडवरील तांबवे-पायरीचा पूल(दत्तवाडी) येथे श्री एकमुखी दत्त प्रभूंच्या मंदिरात श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाcनिमित्ताने शुक्रवार दि.२० मार्च रोजी एक दिवसीय श्री विष्णु याग व श्री स्वामी याग अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती श्री दत्त मंदिर समितीचे सदस्य बापू तात्या मुंडपणे यांनी दिली.
श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त दि.२० मार्चला सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत श्री विष्णु याग व श्री स्वामी याग यामध्ये प्रायश्चित, प्रसादसंकल्पन, पंचांगकर्म,मंडलदेवता तास्थापन, अभिषेक,अग्निमंथन, नवग्रह हवन, महाआरती असे कार्यक्रम होणार आहेत. तसेच दु. ३ ते ५ या काळात वास्तुशास्त्र व ज्योतिषशास्त्र या विषयावर प्रश्न-उत्तरे कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे सायं. ५ ते ७ यावेळेत वारकरी भूषण ह.भ.प. गणेशानंद महाराज धुमाळ,देशमुखवाडी यांचे हरिकीर्तन होणार आहे. तसेच सायं.७ वाजता फुलांचा कार्यक्रम आणि सायं.७ ते ९ वाजेपर्यंत सर्व भक्तांना महाप्रसादाची सोय करण्यात आलेली आहे.
या श्री स्वामी समर्थ प्रकट दिना कार्यक्रमा दिवशीचे अन्नदाते माजी पं.स.सदस्य अनिल जाधव (महाळुंग) व मोहोळ चे संतोष वायचळ हे आहेत. श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाचा कार्यक्रम नाशिक येथील यज्ञाचार्य मयूर परेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार असून श्री स्वामी समर्थ व श्री दत्त भक्तांनी या कार्यक्रमासाठी शुक्रवारी उपस्थित राहावे असे आवाहन मनोकामना पूर्ती श्री एकमुखी दत्त मंदिर व श्री स्वामी समर्थ मंदिर समितीचे सदस्य आबासाहेब साळुंखे यांनी केले आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा