Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १८ मार्च, २०२६

*चाकोरे ता. माळशिरस येथील जिल्हा परिषद शाळेत "गुढीपाडवा पट वाढवा" कार्यक्रम उत्साहात*

 *अकलूज-- विशेष प्रतिनिधी* 

 *एहसान.  मुलाणी* 

  *टाइम्स 45 न्यूज मराठी* 

  *मो:-9096837451*


जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा चाकोरे ता. माळशिरस येथे बुधवार  दि. १८ रोजी "गुढीपाडवा पट वाढवा" उपक्रमांतर्गत पुढील शैक्षणिक वर्षात पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थी आणि पालकांचा सत्कार समारंभ उत्साहात साजरा केला. 

  या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अकलूज येथील पत्रकार शशिकांत कडबाणे आणि प्रमुख व्याख्याते म्हणून पत्रकार गणेश करडे सर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा शुभांगी शिंदे , उपाध्यक्ष सोनाली कोकरे  सर्व सदस्य आणि मुख्याध्यापक बाळासाहेब शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते. 


      सर्व प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले आणि मान्यवरांच्या हस्ते नवीन दाखल विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन स्वागत करण्यात आले. 

    विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मराठी शाळा महत्त्वाची भूमिका बजावतात. चाकोरे शाळेची पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाले आहेत. शाळेत गुणवत्ता पुर्ण विद्यार्थी घडत आहेत असे मत प्रमुख पाहुणे शशिकांत कडबाणे यांनी व्यक्त केले तर प्रमुख व्याख्याते गणेश करडे यांनी आपल्या भाषणात आपली पहिली शाळा ही सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो, या शाळेतील आठवणी आपण आयुष्यभर विसरत नसतो तसेच जिल्हा परिषद चाकोरे शाळेने केलेले या मुलांचे स्वागत कधीही विसरणार नाहीत तर मोबाईल, टिव्ही यात अडकलेली मुले शाळेत दाखल करून अभ्यासात,कलागुणांत,खेळात अडकवून संस्कारक्षम करणे गरजेचे असल्याचे सांगितले तर चाकोरे शाळेतील शिक्षक गुणवत्ता, स्पर्धा परीक्षा सर्वच बाबतीत परिपूर्ण विद्यार्थी घडवित आहेत. महापुरुषांच्या विचारांवर आपला विद्यार्थी घडला पाहिजे यासाठी पालकांनी लक्ष दिले पाहिजे असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बाळासाहेब शिंदे यांनी केले तर पालक जोतीराम नलवडे यांनी तसेच सहशिक्षक प्रदीप राजगुरू यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक तुकाराम वाघमोडे यांनी केले. तर आभार जेष्ठ शिक्षक ज्ञानेश्वर बेंदगुडे यांनी मानले


कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून झाली. 

      कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी

मुख्याध्यापक बाळासाहेब शिंदे, ज्ञानेश्वर बेंदगुडे, तुकाराम विष्णू वाघमोडे,एकनाथ कदम,निसार पठाण, प्रदीप राजगुरू, तुकाराम ज्ञानदेव वाघमोडे यांनी परिश्रम घेतले.


चौकट


चाकोरे गावातील सर्वेक्षण केल्यानंतर १७ बालके पहिली प्रवेशासाठी पात्र आहेत त्यापैकी १२ बालकांचा आज प्रवेश निश्चित झाला आहे. तर उर्वरित विद्यार्थी लवकरच शाळेत दाखल करून घेतली जातील या नवीन  पहिलीतील विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन कोर्स एक महिन्याचा शाळेत राबविला जाणार असून यामध्ये विद्यार्थी ओळख, गप्पागोष्टी, मुळाक्षरे, उजळणी, मनोरंजनात्मक खेळ घेण्यात येणार आहे


बाळासाहेब शिंदे

मुख्याध्यापक 

जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा चाकोरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा