Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १६ मार्च, २०२६

*इंदापूर येथील लोकअदालतीत सन्माननीय* *तडजोडी अंती १० कोटी ६० लाख ७७ हजार ९७७ रुपयांची विक्रमी वसुली तर ४५७ प्रकरणे निकाली. निरा भीमा सहकारी साखर कारखाना व बँक ऑफ इंडिया मध्ये तडजोडी अंतर्गत ९* *कोटी रुपयांची वसुली*

 *इंदापूर,डॉ. संदेश शहा*

*टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९*



इंदापूर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय येथे शनिवार दिनांक १४ मार्च रोजी संपन्न झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकूण ४५७ प्रकरणे सन्माननीय तडजोडी अंती निकाली निघाली. यावेळी १० कोटी ६० लाख ७७ हजार ९७७ रुपयांची विक्रमी वसुली  करण्यात आली. विशेष म्हणजे तालुक्यातील शहाजीनगर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखाना व  बँक ऑफ इंडिया मध्ये झालेल्या सन्माननीय तडजोडी अंतर्गत नऊ कोटी रुपयांची वसुली झाली.

इंदापूरचे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही लोक अदालत संपन्न झाली.  या लोकअदालतीमध्ये सहदिवाणी न्यायाधीश पी. सी. बारटक्के, एम. एच. फारुकी, पी. आर. सबनीस व ए. बी. पाटील यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पार पाडले तर ॲड एस. एस. सवाणे, ॲड आर. जी. मेनसे, ॲड. एस. पी. दुनाखे, ॲड. व्ही. एच. चव्हाण, ॲड सी. डी. कांबळे यांनी

पॅनल सदस्य म्हणून कामकाज पाहिले.

इंदापूर न्यायालय प्रांगणात संपन्न झालेल्या या लोकअदालतीमध्ये एकूण २४५३ प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ४५७ प्रलंबित प्रकरणांमध्ये तडजोड होऊन १० कोटी ६० लाख ७७ हजार ९७७ रुपयांची वसुली झाली तर दाखल पूर्व १५ हजार ४८३ प्रकरणांपैकी ९ हजार १८ प्रकरणे निकाली होऊन ४ कोटी ६० लाख ३३ हजार ३७४ इतक्या रकमेची वसुली झाली. यामुळे एकूण १७ हजार ९३६ प्रकरणा पैकी ९ हजार ४७५ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन तब्बल १५ कोटी २१ लाख ११ हजार ३५१ रुपयांची वसुली झाली.

यावेळी राष्ट्रीय लोकअदालतीचे नऊ कोटी रुपयांची तडजोड करणाऱ्या पक्षकारांचा सत्कार न्यायाधीश ए. बी. पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. या लोक अदालतीच्या निमित्ताने संपूर्ण न्यायालय परिसरामध्ये पक्षकारांनी मोठ्या प्रमाणावरती गर्दी केली होती. यावेळी इंदापूर तालुका वकील संघटनेचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य यांच्यासह जिल्हा व सत्र न्यायालयाचे सहायक अधिक्षक एस. व्ही. सय्यद, न्यायालयीन कर्मचारी प्रतीक चिंचकर, संतोष दरदरे, आकाश खंदारे यांच्यासह कर्मचारी वर्ग, पोलिस कर्मचारी, महावितरण, युनियन बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, पंचायत समितीचे अधिकारी व ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान इंदापूर जिल्हा व सत्र न्यायालयातील लोक अदालतीमध्ये निरा भीमा सहकारी साखर कारखाना व बँक ऑफ इंडिया यांच्या व्यवहारासंदर्भात  प्रकरण ठेवण्यात आले होते. यामध्ये तडजोडी अंती यशस्वी तोडगा निघून तब्बल नऊ कोटी रुपयांची यशस्वी तडजोड झाली. यावेळी पॅनल प्रमुख न्यायाधीश म्हणून न्यायाधीश ए. बी. पाटील यांनी न्यायदानाचे काम केले. निरा भीमा कारखान्याच्या वतीने ॲड.आर. यू. चौधरी यांनी तर बँकेच्या वतीने ॲड बापूराव दिवेकर यांनी कामकाज पाहिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा