**उपसंपादक --नुरजहां शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
वाढत्या उन्हापासून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात भरणार असल्याचा निर्णय शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी घेतला असल्याचे सांगितले
राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, सोलापूर जिल्ह्यातही मार्चच्या सुरुवातीलाच सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि वाढते तापमान लक्षात घेऊन सोलापूर जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा ९ म ार्चपासून म्हणजे आजपासून सकाळच्या सत्रात भरवण्याचे
आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिले आहेत
यंदा उन्हाळ्याची चाहूल लवकरच लागली असून म ार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी ३७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
मंगळवारी देखील पारा ३८ अंशावर स्थिरावला होता. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, संपूर्ण मार्च महिना तापलेला राहणार असून तापमान ३३ ते ३९ अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळेत वाढणाऱ्या उन्हामुळे विद्यार्थ्यांना शाळेत बसणे आणि घरी परतणे कठीण होत होते. सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण २ हजार ७७५ शाळा
असून यामध्ये सुमारे १ लाख ९८ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. वाढत्या उन्हाचा तडाखा पाहता, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शाळा सकाळच्या सत्रात सुरू कराव्यात, अशी मागणी विविध शिक्षक संघटनांनी प्रशासनाकडे केली होती. या मागणीची दखल घेत शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी ९ मार्चपासून वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा