अनिसा सिकंदर शेख
९२७००५५६६६
*नारी शक्ती* (अष्टाक्षरी रचना)
दया प्रेम सेवा त्याग
शिल्पकार ती जगाची
आदिशक्ती काली चंडी
गूढ़रहस्य सृष्टीची
क्षमा लज्जा प्रीत धैर्य
लुप्त चंद्राची चांदणी
अरुर्णिमा सूर्याची ती
कळ्या मेघाची दामिनी
नारी शक्ती भूतलाची
नवसृजन करती
आई भार्या ताई सखी
सभ्यतेची ओळख ती
स्वयंसिध्दा संस्कारी ती
रणचंडी मर्दानी ती
चंद्रावर जाणारी ती
कारभारी इंदिरा ती
शील संयमाची मूर्ती
भूतलाचे अस्तित्व ती
संसाराचे होते चाक
धैर्यवान 'सुनेत्रा' ती
आज स्त्री अबला नाही
नाही कमकु्व्वत ती
लढते अन्यायाविरुद्ध
जगताची उध्दारी ती
अनिसा सिकंदर शेख
९२७००५५६६६




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा