Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २५ मार्च, २०२६

*सोलापूर अजमेर सोलापूर विशेष सुपरफास्ट गाडीला जेऊर रेल्वे स्थानकावर थांबा द्यावा ; खा. धैर्यशील मोहिते पाटील यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*


नवी दिल्ली येथे खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन सोलापूर–अजमेर–सोलापूर (09627–09628) विशेष सुपरफास्ट” रेल्वेगाडीला जेऊर (ता. करमाळा) रेल्वे स्थानकावर अधिकृत थांबा देण्याची मागणी केली

खासदार मोहिते पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, जेऊर रेल्वे स्थानक करमाळा, जामखेड, परांडा तसेच कर्जत-राशिन परिसरासाठी अत्यंत सोयीचे असून या भागातील नागरिकांच्या प्रवासासाठी ते महत्त्वाचे केंद्र आहे. या परिसरात मुस्लिम समाजाची लोकसंख्या मोठी असून अजमेर येथील प्रसिद्ध दरगाह शरीफ येथे दर्शनासाठी अनेक भाविक नियमितपणे प्रवास करतात..

तसेच जेऊरपासून सुमारे ३० किमी अंतरावर आवाटी येथे अलहज वली चाँदपाशा वली यांची प्रसिद्ध दरगाह असून देशभरातून हजारो भाविक येथे येत असतात. याशिवाय सूरत येथील मोठ्या होलसेल कापड बाजारामुळे व्यापारी वर्गाचीही मोठी ये-जा सुरू असते. राजस्थानमधील कामगार तसेच पर्यटनासाठी जयपूरसह विविध ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांची संख्या देखील लक्षणीय आहे.

सोलापूर विभागातून अजमेरसाठी ही एकमेव थेट रेल्वेगाडी उपलब्ध असल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी या गाडीला जेऊर स्थानकावर आगमन-प्रस्थानाचा अधिकृत थांबा देण्यात यावा, अशी विनंती खासदारांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा