Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २५ मार्च, २०२६

टेंभुर्णीत २९ मार्चला रंगणार 'माय-बाप' स्मृती साहित्य पुरस्कार सोहळा आणि निमंत्रितांचे कवी संमेलन ज्येष्ठ साहित्यिक हरिश्चंद्र पाटील यांच्या पुस्तकांचे प्रकाशन व नामवंत साहित्यिकांची मांदियाळी; काव्यपुष्पांजली मंडळाचा उपक्रम

 उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी



ज्येष्ठ साहित्यिक हरिश्चंद्र पाटील यांच्या पुस्तकांचे प्रकाशन व नामवंत साहित्यिकांची मांदियाळी; काव्यपुष्पांजली मंडळाचा उपक्रम

येथील काव्यपुष्पांजली मंडळ, टेंभुर्णी यांच्या वतीने आयोजित 'माय-बाप' स्मृती साहित्य पुरस्कार वितरण, पुस्तक प्रकाशन आणि निमंत्रितांचे भव्य कवी संमेलन येत्या रविवार, दिनांक २९ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे. करमाळा चौक येथील पुष्पक मंगल कार्यालय येथे सकाळी १०:३० वाजता हा सोहळा संपन्न होणार असून, साहित्याचा मोठा उत्सव यानिमित्ताने रंगणार आहे.

महत्त्वाचे प्रकाशन आणि पुरस्कार

या कार्यक्रमात प्रसिद्ध कवी व लेखक हरिश्चंद्र पाटील यांच्या 'सोन्याचा दगड' आणि 'मामाचा गाव' या दोन कथासंग्रहांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच, साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खालील मान्यवरांना 'माय बाप' स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल इंद्रजित पाटील (सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह 'कळ पोटी आली ओठी') धनाजी घोरपडे (सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह 'जामिनावर सुटलेला काळा घोडा') रसुल सोलापुरे (सर्वोत्कृष्ट कथासंग्रह 'पठारावरला दौलती') विशाल मोहोड (सर्वोत्कृष्ट कादंबरी 'कीड') ज्ञानदेव साखरे व विलास देशमुख (सर्वोत्कृष्ट वाचक पुरस्कार)



मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाचे उद्घाटन टेंभुर्णीच्या सरपंच मा. सौ. सुरजाताई बाबाराजे बोबडे आणि उपसरपंच मा. सौ. राजश्री सतीश नेवसे यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे (सोलापूर) भूषवणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. शिवाजी शिंदे (सहायक कुलसचिव, सोलापूर विद्यापीठ), प्रा. डॉ. हमीद आवटे (पुणे), गणपत जाधव, राजेश पवार, अंकुश गाजरे, विजय भैय्या देशमुख, हॉटेल राजवीर चे मालक सोनाजी महाडिक पाटील, संजय वाघ, प्रा. फरीदा आवटे, रामचंद्र इकारे, भास्कर बंगाळे, अरुण कटारे यांसह संध्या धर्माधिकारी, विमल माळी व शशिकला गुंजाळ यांची उपस्थिती लाभणार आहे.

साहित्य आणि संस्कृतीची जोपासना व्हावी आणि ग्रामीण भागातील लेखकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

आयोजक समिती (हरिश्चंद्र पाटील, डॉ. हमीद आवटे, प्रशांत वाघ, किरण निकम)

दुपारच्या सत्रात   निमंत्रितांचे भव्य कवी संमेलन रंगणार असून, त्याचे अध्यक्षपद कवी प्रशांत वाघ भूषवतील, तर सूत्रसंचालन कवी संजय साठे करणार आहेत. या संमेलनात विशाल मोहोड, धनाजी घोरपडे, श्रेया पाटील, किरण निकम, श्रीकृष्ण जगदाळे, संभाजी अडगळे, सचिन कुलकर्णी, राहूल काळे, राहुल निकम, सोमनाथ टकले, विनोद तांबे, नूरजहाँ शेख, सुनील अडगळे, दत्ता चव्हाण, रणजित लोंढे, मारुती कुंभार, भारत जाधव आणि भास्कर सोनवणे हे नामवंत कवी आपल्या कविता सादर करतील.

या सोहळ्यास सर्व साहित्यप्रेमींनी बहुसंख्येने

उपस्थित राहावे, असे आवाहन काव्यपुष्पांजली मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा