Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २० मार्च, २०२६

*प्रा. डॉ. उत्तम मोटे यांची "शिक्षक प्राध्यापक आघाडी" पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती*

 *संपादक- सा. गस्त पथक*

*बी.टी .शिवशरण,श्रीपूर*



आटपाडी (जि. सांगली) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) च्या वतीने शिक्षक व प्राध्यापक वर्गाचे संघटन अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने “शिक्षक प्राध्यापक आघाडी” स्थापन करण्यात आली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी प्रा. डॉ. उत्तम एकनाथ मोटे (श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय, आटपाडी) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती कोल्हापूर येथील दसरा चौक, शाहू महाराज हॉल येथे आयोजित कार्यक्रमात संघटन सचिव प्रा. शहाजी कांबळे यांच्या हस्ते जाहीर करण्यात आली. यावेळी रवी लांडगे, जितेंद्र कांबळे, अ‍ॅड. सडोलीकर, प्रदीप बाबर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रा. डॉ. उत्तम मोटे हे शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचार समाजात रुजविणारे, रिपब्लिकन पक्षाचे एकनिष्ठ व सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. सध्या ते आटपाडी एज्युकेशन सोसायटी अंतर्गत श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय, आटपाडी येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून दिले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी UPSC, MPSC सारख्या परीक्षांमधून उच्च पदांवर पोहोचले आहेत.

प्रा. डॉ. उत्तम मोटे हे आंबेडकरी चळवळीतील स्वाभिमानी व प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर सातत्याने कार्य करून ते समाजात जागृती निर्माण करत आहेत. विद्यार्थी वर्गासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांच्या अडचणीच्या काळात मदतीचा हात देणारी व्यक्ती म्हणून त्यांची विशेष ख्याती आहे. विविध सामाजिक व राजकीय आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून त्यांनी आपली बांधिलकी सिद्ध केली आहे. ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंतच्या विविध आंदोलनांमध्ये त्यांनी सातत्याने सहभाग घेतला आहे. गेली सुमारे तीस वर्षे रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीत कार्यरत राहून त्यांनी संघटन बळकट करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे.

या नियुक्तीमुळे पश्चिम महाराष्ट्रात शिक्षक व प्राध्यापक संघटन बळकट होण्यास मोठी मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

प्रा. डॉ. उत्तम मोटे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा