*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागितलेली माहिती वेळेत न देणे आणि वरिष्ठ कार्यालयांच्या आदेशांचे उल्लंघन करणे परंडा तालुक्यातील आलेश्वर ग्रामपंचायत चे तत्कालीन ग्रामसेवकाला चांगलेच महागात पडले आहे. राज्य माहिती आयुक्तांच्या खंडपीठाने याप्रकरणी कडक पाऊल उचलत संबंधित ग्रामसेवकाला १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
नेमके प्रकरण काय?
अर्जदार फारूक बाशामिया मुलाणी यांनी ३० डिसेंबर २०२२
रोजी माहिती अधिकार कायद्यान्वये माहिती मागितली होती. माहितेचे स्वरूप आपल्या कार्यालयाकडे केंद्र व राज्य सरकारचे निधी आले किती व खर्च खोटे करण्यात आले ही सर्व सत्य प्रति नकला मिळावे म्हणून . मात्र, जन माहिती अधिकाऱ्यांनी विहित मुदतीत माहिती न दिल्याने फारुक मुलाणी यांनी १२ जानेवारी २०२२ रोजी विस्तार अधिकारी, पंचायत समिती परंडा यांच्याकडे प्रथम अपील दाखल केले होते.
या अपिलावर २५ फेब्रुवारी २०२२ रोजी सुनावणी होऊन विस्तार अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामसेवकाला सात दिवसांच्या आत विनामूल्य माहिती देण्याचे आदेश दिले होते. मात्र, ग्रामसेवकाने या आदेशाला केराची टोपली दाखवत माहिती दिली नाही.
खंडपीठाची कारवाई,,,,,,,,
वरिष्ठ स्तरावरून आदेश देऊनही माहिती मिळत नसल्याने फारूक मुलाणी यांनी राज्य माहिती आयुक्तांच्या खंडपीठाकडे धाव घेतली. या प्रकरणावर २९ जानेवारी २०२३ रोजी सुनावणी झाली. त्यानंतरही माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने मुलानी यांनी पुन्हा पत्रव्यवहार केला. अखेर १४ मे २०२४ रोजी झालेल्या सुनावणीत खंडपीठाने कठोर भूमिका घेतली.
माहिती अधिकार कायद्याचा अवमान केल्याबद्दल आणि कर्तव्यात कसूर केल्याबद्दल तत्कालीन ग्रामसेवकाला १० हजार रुपये दंड आकारण्याचे आदेश खंडपीठाने पारित केले. या आदेशाची प्रत ११ डिसेंबर २०२४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी (धाराशिव), गटविकास अधिकारी (परंडा) आणि अर्जदार यांना दि .11/12/2025 रोजि प्राप्त झाली आहे.
त्या आदेशानुसार गट विकास अधिकारी परंडा पंचायत समिती यांनी दिनांक १६ /३/२०२६ नुसार आस्थापना विभाग (२) दहा हजार रुपये वसूल करून घ्यावे व चलनाचे पावती या कार्यात सादर करावी असे पत्र काढले आहे.
या कारवाईमुळे माहिती अधिकारात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून, अर्जदाराने दिलेल्या कायदेशीर लढ्याचे सर्वत्र कौतुक सत्कार करण्यात आले यावेळी फारूक शेख . कानिफनाथ सरपने . विजय मेहेर . जमीर शिकलकर भाऊ करळे . धनजय गोफने, अश्विनी मगर, आसलम पल्ला . किशोर येवारे ईत्यादि उपस्तित होते .




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा