*मुख्य संपादक*
*हुसेन. मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
. *मो:-9730867448*
*पत्रकारितेचा वसा पेलत असताना धैर्य, आचार,विचार, आणि सामर्थ्य यातून तावून सुलाखून निघालेले बोल*
""""""""""""""""""""""""""""""""
*कृपया सोशल मीडियावरील सर्वांना विनंती हे आचार, विचार सर्वांनी वाचावे*
"""""""""""''"""""'"'''"""'''''"'''""'"
*माझी पत्रकारिता ना कुणाच्या सत्तेसाठी, ना कुणाच्या मालमत्तेसाठी ,फक्त आणि फक्त माझ्या बुद्धिमत्तेच्या विकासासाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी*
तुळजापूर तालुका व विशेषतः मंगरुळच्या शैक्षणिक, सामाजिक व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचारावर व विकासात्मक कामावर वाचा फोडन्यासाठी ,माझ्या सकारात्मक लिखाणामुळे तुळजापूर तालुका व विशेषतः मंगरुळ गावात अनेक शैक्षणिक उपक्रम राबवले गेले ,अनेक सामाजिक, शैक्षणिक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येऊन त्याचा राजकीय फायदाही घेतला गेला व त्याचे अनुकरण बऱ्याच जणांनी केले गेल्या चौदा वर्षांपासून सातत्याने पत्रकारिता व सार्वजनिक जीवनात वावरत असताना अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी अनेक वेळा राजकीय दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला(मी माझ्या संपूर्ण आयुष्यात एकदा फक्त राजकीय व्यासपीठावर गेलो आहे तेही पत्रकारितेत येण्यापूर्वी जेव्हा रविंद्र गायकवाड सर लोकसभेची पहिली निवडणूक लढवत होते तेव्हा) परंतु मी माझ्या सकारात्मक पत्रकारितेच्या माध्यमातुन रस्ते, सार्वजनिकगटार ,पाणीपुरवठा, वीज पुरवठा, अनेक जाती धर्माचे विविध प्रश्न, शेतकऱ्यांच्या व्यथा व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या संस्था, राजकीय व्यक्तिमत्व, शाळा, शालेय व्यवस्थापन समिती, वारकरी संप्रदाय, पोलिस प्रशासन, महसुल, कृषी विभाग व शालेय उपक्रम राबवणाऱ्या सामाजिक संस्था व्यक्ती यांच्या बातम्या वर्तमापत्राद्वारे मांडल्या आहेत माझ्या लिखाणामुळे कुणाचा राजकीय फायदा झाला असेल तर ते त्यांचे वैयक्तिक कार्य कर्तृत्व आहे यामुळे मला जे आजपर्यंत योग्य वाटले ते मी मांडले , लिहिले यापुढेही कुणाचाही राजकीय मुलाहिजा न ठेवता, राजकीय दबाव न जुगारता सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी लिहित राहणार वेळप्रसंगी कायद्याच्या चौकटीत राहुन नडणार अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांना,पदाधिकाऱ्यांना बातम्यांच्या माध्यमातून प्रसिद्धी दिली आहे काहीं बातम्या संपूर्ण छापणे माझ्याही हातात नसतात संपादकीय मंडळ अनेकांची नावे घेतलेली असताना टाळतात हे येथे मांडणे उचित ठरणार नाही परंतु काहींची बुद्धी कमकुवत असल्याने त्यांच्या बुद्धीत भर घालण्यासाठी येथे लिहावे लागत आहे मी आजपर्यंत अनंत बातम्या घेतल्या असून कुणाच्याही चहा मध्ये सुद्धा मींदा नाही (कुणीही एक रुपया घेतला आहे असे दाखवून दिल्यास योग्य ते बक्षिस जाहीर सत्कार करून देण्यात येईल)वर्षाला अपेक्षित जाहिराती मिळाव्या हा कुठल्याही ग्रामीण पत्रकाराचा हक्क असताना मला आजपर्यंत अपेक्षित जाहिराती मिळाल्या नाहीत काही जणांनी जाहिराती घ्यायलाही लावल्या परंतु त्याचे पेमेंट आजपर्यंत अदा केले नाही (तालुक्यातील टक्केवारी पुढारी/राजकारण करून घर भरणारे) मी माझ्या उदरनिर्वाहातून त्याचे पेमेंट केले कुणालाही त्याबद्दल साध्या शब्दानेही बोललो नाही हे एवढे स्पष्ट सांगण्याचे कारण की तुळजापूर तालुक्यातील व विशेषतः मंगरुळ येथील (काही अपवाद वगळता)राजकारणात सक्रिय असलेल्या रहिवाशांची कमकुवत बुद्धी
मी कुणाच्या राजकीय दबावाला बळी न पडता यापुढेही सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे लिहिणार कारण माझ्यावर आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जबरदस्त पगडा आहे अनेक राजकीय भेखडे निर्माण होतील काही विरोध करतील काही बदनामी करण्याचा प्रयत्न करतील परंतु मी हा पत्रकारितेचा घेतलेला वसा कदापिही सोडणार नाही आपल्या संपूर्ण तुळजापुर तालुक्यातील व विशेषतः मंगरुळ वासियांच्या शुभेच्छा व सदिच्छा कायम राहतील अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो
*पत्रकार --चांदसाहेब शेख*
*समजदार को इशारा काफी है*
*फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा पगडा असलेल्या धाडसी आणि निष्कलंक "पत्रकार चांद साहेब शेख "यांना"टाइम्स 45 न्यूज मराठी" चे संपादक हुसेन मुलाणी आणि आमच्या टीमच्या वतीने सलाम...




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा