Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ३ मार्च, २०२६

जातेगाव येथील भैरवनाथ माध्यमिक विद्यालयात विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*


भैरवनाथ माध्यमिक विद्यालय जातेगाव या प्रशालेत राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी थोर शास्त्रज्ञ सी. व्ही रमण डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम तसेच देशभक्त कै. नामदेवराव जगताप यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 


या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आबासाहेब काकडे महाविद्यालय शेवगाव चे माजी प्राचार्य  किसनराव धुमाळ सर जनता विद्यालय खोपोली चे  तात्यासाहेब शिंदे सर जातेगावातील ग्रामस्थ मोहन धुमाळ सर भिबिषण निकम सर भाऊसाहेब  शिंदे तानाजी शिंदे प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते संस्थेचे सचिव व मुख्याध्यापक  युसुफ शेख सर यांनी अध्यक्षीय भाषणात मराठी भाषेचे महत्त्व सांगताना मराठी भाषा आपली मातृभाषा आहे तिचा अभिमान आपल्याला असलाच पाहिजेत विज्ञानातून देशासाठी गावासाठी व शाळेसाठी काहीतरी करीन असा संकल्प विद्यार्थ्यांनी करावा असे आव्हान केले. माजी प्राचार्य धुमाळ सर यांनी सी. व्हि रमण यांच्या विज्ञान शोधाची माहिती सांगितली तर तात्यासाहेब शिंदे सर यांनी मराठी भाषा व विज्ञान यांचे जीवनातील महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे इयत्ता नववीतील आशिष चाळसे व व आदेश चाळसे यांनी मिसाइल ची प्रतिकृती बनवून सर्वांचे लक्ष केंद्रित केले NMMS परीक्षेत ज्ञानेश्वरी वेदपाठक या विद्यार्थिनीने चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याबद्दल मान्यवरांनी तिचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आजिनाथ घुले सर यांनी केले शेवटी पुरुषोत्तम माने सर यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा