*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
जेऊर स्थानकावरील विविध अडीअडचणी व सोयी सुविधा उपलब्ध करून त्याबाबत सूचना करणेबाबत प्रवासी असोसिएशनच्या वतीने करमाळा कुर्डूवाडी आणि सोलापूर आगार प्रमुख निवेदनाद्वारे मागणी केली असून ती पुढील प्रमाणे. -
1) पंढरपूर धुळे पंढरपूर या गाडीला जेऊर येथे थांबा द्यावा. मशीन मध्ये समाविष्ट करावा.
2) मालेगाव - पंढरपूर - मालेगाव
वाडा - पंढरपूर - वाडा
नंदुरबार - पंढरपूर - नंदुरबार
या गाड्या जेऊर बस स्थानकामध्ये येत नाहीत त्यामुळे करमाळा येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची फार गैरसोय होते त्या गाड्या जेऊर बस स्थानकामध्ये दररोज याव्यात.
3) नाशिक १ आगाच्या काही गाड्यांनी जेऊर फाटा असे तिकीट मशीन मध्ये
नमूद केले आहे व ते बायपासला प्रवाशांना सोडतात तर ते चुकीचे असून जेऊर असे
तिकीट करावे.
4) जेऊर ते पुणे (स्वारगेट) अशी सकाळी 08 वाजता बस सेवा चालू करावी, व परतीचा प्रवास स्वारगेट मधून संध्याकाळी 04 वाजता बस सुट्टावी.
5) महामंडळाच्या नवीन योजनांचे स्मार्ट कार्ड तयार करण्याचे सेंटर जेऊर येथे बालू करा, त्यामुळे अपंग जेष्ठ नागरिक अमृत ज्येष्ठ नागरिक महिलावर्ग यांची सोय होईल.
5) करमाळा टेंभुर्णी शटल या गाडीचे एसी तिकीट आकारले जाते परंतु ती सुविधा दिली जात नाही. त्यामुळे त्या गाडीला एसीचे तिकीट दर लावू नयेत.
7) चिकलठाण यात्रा व आवाटी उरूस या कालावधीमध्ये जास्तीत जास्त जेऊर मधून बस सोडण्यात याव्यात.
8) जेऊरवाडी फाट्याजवळ बस जेऊर स्थानक कडे येताना वळवताना बस तेथे रोडला घासतात तेथे रस्ता लेव्हल दुरुस्ती किंवा सर्कल होणे गरजेचे आहे.
9) जेऊर बस स्थानकातून सर्व बस जावाव्यात म्हणून करमाळा व टेंभुर्णी बस स्थानकात प्रत्येक गाडीच्या लॉक सीटवर शिक्के मारून सूचना द्याव्यात.
10) करमाळा - सातारा
पारेवाडी - कुईवाडी
करमाळा - अक्कलकोट
या नियमित चालणाऱ्या गाड्या बंद केलेल्या असून त्या गाड्या पुन्हा चालू करण्यात याव्यात. इत्यादी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आले आहेत






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा