*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
जामखेड शहरातील
अलीशा मजहर खान वय 4 वर्ष आजाद नगर जामखेड या चिमुकलीने रमजान महिन्यातील एक दिवसाचा कडक असा रोजा पूर्ण केला आहे सध्या इस्लाम धर्माचा महत्वपूर्ण असा महिना म्हणजे रमजानचा महिना चालू आहे या रमजान महिन्यातील उपवास मुस्लिम बांधव करीत असतात सलग 14 तास बिगर अन्नपाण्या शिवाय सदरचा उपवास अर्थात रोजा केला जातो असा हा एक दिवसाचा उपवास कुमारी आलिशा या चिमुकलीने अगदी लहान वयात पूर्ण केला आह
सदरचा रोजा तिने आपल्या कुटुंबिया सहित जामखेड शहरातील ताज मशीद मध्ये सोडला यावेळी मौलाना कारिसाब सहित बहुसंख्य मुस्लिम बांधव मशिदीमध्ये उपस्थित होते
आलिशा यांनी अगदी लहान वयात रोजा पूर्ण केल्याबद्दल तिचे समाजसेवक गौस भाई शेख, बाबू भाई मुलानी, रफिक खान, कबीर पटेल, मुजीब पटेल, पत्रकार अलीम भाई शेख ताहेर खान आदींनी तिचे विशेष अभिनंदन केले आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा