Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १७ मार्च, २०२६

*अकलुज नगर परिषदे कडून दंडात्मक व्याजाच्या "अभय योजने"स मुदत वाढ द्यावी--- नागरिकांची मागणी* *मात्र दंडात्मक व्याजाला अभय मिळेल का नाही ? याची नागरिकांवर टांगती तलवार?*

 *मुख्य संपादक*

   *टाइम्स 45 न्यूज मराठी*

           *मो:-9730867448*


अकलूज नगर परिषदेने मालमत्ता करा वरील शास्ती (दंडात्मक व्याज)  वगळून मालमत्ता कर  नागरिकांना भरावे असे  आवाहन नगरपरिषदेच्या वतीने केले असून शासनाच्या "अभय योजना " या योजनेच्या अंतर्गत दंडात्मक व्याज माफी बाबत चा प्रस्ताव शासनाकडे पाठवला असून शासनाच्या निर्णयानंतर दंडात्मक व्याज माफ होईल  असे आश्वासन  अकलूज नगर परिषदेचे मुख्य अधिकारी पाटील यांनी दिली असून त्या अनुषंगाने अकलूज शहरात दवंडी दिली जात आहे मात्र या योजनेस अंतर्गत मालमत्ता थकबाकी भरण्यासाठी अवधी खूपच  कमी  असून नागरिकांची त्रेचा तिरपट उडत आहे कारण मार्च महिना म्हटले की मार्च एंडिंग आले बँका असोत सोसायटी असो  वीज वितरण कंपनी असो किंवा बचत गट ,मायक्रो फायनान्स असो प्रत्येक जण या महिन्यात प्रत्येकाचा वसुलीचा ससे मिरा नागरिकांच्या मागे लागलेला असतो त्यामुळे नागरिकांनी मार्च एंडिंग  मुळे कोणाकोणाचे बिल भरावे हा प्रश्न निर्माण होतो  आमदनी अठन्नी खर्चा रुपया याप्रमाणे व्यावसायिकांना व्यवसाय नाही  मजुरांना काम नाही शिवाय वाढत्या महागाईमुळे प्रपंचाचा गाडा ओढणे कठीण झाले आहे त्यामुळे  नागरिक त्रस्त झाले आहेत  आणि सर्वांचेच बिल मार्च एंडिंग मध्ये भरू शकत नाही अकलूज ग्रामपंचायतचे रूपांतर नगर परिषदेमध्ये झाल्या पासून अकलूज करांची मागणी होती की दंडात्मक व्याज वसूल करू नये मात्र तेव्हापासून नगरपरिषद प्रशासन नागरिकांच्या मागणीला फाटा देत  आले आहेत  केवळ यासाठीच 43 दिवस अकलूज करांनी आंदोलन करून नगरपरिषद ऊरावर घेतली आणि शास्ती कर रुपी  घोडा. ..... घेतला नगरपरिषद निवडणुकीनंतर नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष ,आणि नगरसेवकांनी शहरवासीयांची बैठक घेऊन नागरिकांना आश्वासित केले आणि त्यानंतर दंडात्मक  व्याज माफ करण्यासाठी अभय योजनेअंतर्गत प्रस्ताव शासनाकडे पाठवून दंडात्मक व्याज शासन दरबारी माफ होईपर्यंत मालमत्ता कर भरा असे आवाहन नगर परिषदेने केली मात्र या योजनेची मुदत 31 मार्च पर्यंत असल्याने नागरिकांना 31 मार्च पर्यंत मालमत्ता कर भरणे अशक्य असल्याने या अभय योजनेची मुदत वाढवावी अशी मागणी अकलूज शहरवासीया कडून होत आहे

     वास्तविक पाहता या अभय योजनेअंतर्गत अकलूज नगर परिषदेने मार्च महिन्यापूर्वी नागरिकांना आवाहन करावयास हवे होते कारण मार्चपूर्वी आवाहन केले असते तर नागरिकांना एक महिन्याचा कालावधी मिळाला असता आणि नागरिकांनी मालमत्ता कर वेळेवर भरले असते शिवाय नगरपरिषदेच्या मालमत्ता कराची वसुली कितीतरी पटीने वाढली असती यात तीळ मात्र शंका नाही तरी अकलूज नगर परिषदेने दंडात्मक व्याज बाबत  अभय योजनेची मुदत वाढविण्या बाबत शासनाकडे पाठपुरावा करावा आणि त्याची मुदत आणखी एक महिना वाढवावी अशी ही नागरिकांमधून मागणी जोर धरत आहे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा