*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
शनिवार दिनांक २१ मार्च २०२६ रोजी संग्रामनगर येथील "कृष्णप्रिया मल्टी फंक्शनल हॉल, येथे रोटरी क्लब अकलूज वतीने "व्यवसाय सेवा पुरस्कार" तसेच "रोटरी सक्षम पुरस्कार" वितरण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.
या सोहळ्या प्रसंगी मार्गदर्शन करताना रोटरी जिल्हा ३१३२ चे जिल्हा प्रांतपाल रो.सुधीर लातुरे यांनी सांगितले की, रोटरी क्लबचे कार्य हे जागतिक पातळीवरील असून पर्यावरण, जल व्यवस्थापन, जागतिक शांतता, आरोग्य, शैक्षणिक क्षेत्र, युवा व्यवस्थापन आणि महिला मुली सशक्तीकरण-सबलीकरण हे मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून या क्षेत्रातील समाजातील उणीवा शोधून त्या दूर-कमी करण्याच्या दृष्टीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून रोटरी सातत्याने प्रयत्नशील राहते. प्रत्येक रोटरी सदस्य क्लबच्या माध्यमातून सेवाभावी वृत्तीने हे कार्य करताना या कार्याबरोबरच समाजात प्रामाणिक कर्तृत्वाने काम करत आणि सेवाभावी वृत्तीने प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींची दखल घेऊन रोटरी क्लबच्या वतीने त्यांना "व्यवसाय सेवा पुरस्कार" तसेच "रोटरी सक्षम पुरस्कार" देऊन सन्मानित केले जाते व हा केवळ पुरस्कार नसून "सेवा, सन्मान आणि प्रेरणा याचा त्रिवेणी संगम" असून तो इतरांसमोर आदर्शवत व दिशादर्शक ठरतो असे मत सूधीर लातूरे यांनी व्यक्त केले.
व्यासपीठावर डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रो.डॉ.राजगोपाल तापडिया सर तसेच सहाय्यक प्रांतपाल रो.डॉ.कैलास करांडे या मान्यवरांची उपस्थिती लाभली.
रोटरीच्या सेवा तत्त्वज्ञानाला उजाळा देणाऱ्या या कार्यक्रमात ज्या व्यक्ती स्वतःचा व्यवसाय तथा नोकरीची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत कुटुंबाबरोबरच समाजाभिमुख कार्यातून वेगळा ठसा उमटविणाऱ्या व्यक्तींना रोटरी क्लब अकलूज मार्फत दरवर्षी "व्यवसाय सेवा पुरस्कार" प्रदान करण्यात येतो. समाजात कर्तृत्वाने आणि सेवाभावी वृत्तीने प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींची दखल घेत यंदाचा रोटरी क्लब अकलूजचा प्रतिष्ठेचा “व्यवसाय सेवा पुरस्कार” हा श्री.वीरेंद्र विठ्ठल पतकी, सौ.आशाताई एकनाथ ढोले-तांदुळकर, श्री.गोरख रामचंद्र डांगे, श्री.आगतराव ज्ञानोबा गायकवाड यांना डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो.सुधीर लातूरे व डिस्ट्रिक्ट सचिव रो.डॉ. राजगोपाल तापडिया यांच्या शुभहस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
तर याच अनुषंगाने प्रतिकूल परिस्थिती स्वतःला सिद्ध करत रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ तर्फे देण्यात येणारा “रोटरी सक्षम पुरस्कार” हा विशेष पुरस्कार महिलांमधून सौ.शुभांगीताई भगवान देशमुख आणि दिव्यांगांमधून श्री.प्रशांत पंडित खरात यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या भव्य सोहळ्यामुळे रोटरीच्या “Service Above Self – स्वतःपेक्षा सेवा श्रेष्ठ” या तत्त्वाचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचला. समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करून त्यांचे कर्तृत्व अधोरेखित करणारा हा सोहळा उपस्थितांच्या मनात प्रेरणेचा दीप प्रज्वलित करणारा व अभिमाचा ठरला असल्याचे मत डॉ.तापडिया तसेच कैलाश करांडे यांनी मनोगतातून व्यक्त केले.
या प्रसंगी रोटरी क्लब अकलूजचे अध्यक्ष केतन बोरावके, सचिव अजिंक्य जाधव, खजिनदार सीए शशील गांधी, सहसचिव कल्पेश पांढरे, डॉ. मनीष गायकवाड, अभिषेक टेके, सीए नितीन कुदळे, गोमटेश दोशी, नवनाथ नागणे, दीपक फडे, डॉ.अभिजीत मगर, अजित वीर, पोपट पाटील, राजीव बनकर, ॲड.प्रवीण कारंडे, गजानन जवंजाळ, बबनराव शेंडगे, आशिष गांधी, मकरंद जामदार, ओजस दोभाडा, विक्रम कोतमिरे, संदीप साळुंखे, संदीप लोणकर, याबाजी, राजीव देवकर, सौ.तृप्ती कुदळे, सौ.तेजस्विनी बोरावके आदी रोटरी सदस्य, फर्स्ट लेडी सौ.संगिता लातुरे, रोटरी कम्युनिटी कॉप्स चे अध्यक्ष घनश्याम जाधव, सदस्य डॉ.अविनाश जाधव, रोहित गिरमे, एस.आर.कुलकर्णी, राजिव लोहकरे, सौ.नमिता जाधव, विजयकुमार जाधव तसेच पुरस्कार्थींचे कुटुंबीय मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक रो.ॲड. प्रवीण कारंडे यांनी केले. अध्यक्ष रो. केतन बोरावके यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचे व उपस्थितितांचे स्वागत करत, रोटरी क्लब अकलूज कडून समाजोपयोगी विविध राबविल्या गेलेल्या व भावी सेवा प्रकल्पांचा आढावा सादर केला. सचिव अजिंक्य जाधव यांनी वर्षाचा लेखाजोखा सादर करत आभार प्रदर्शन व्यक्त केले व उपस्थितांना स्नेहभोजनाचा आस्वाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. प्रवीण कारंडे व गजानन जवंजाळ यांनी केले.
या सोहळ्याला जोडूनच रोटरी ऑफिसमध्ये जिल्हा प्रांतपाल रो. सुधीर लातूरे यांच्या प्रमुख उपस्थितीत डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ऑफिशियल क्लब व्हिजिट अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडली.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा