*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
मंगळवेढा येथील ॲड वृषाली इंगळे यांची महाराष्ट्र राज्याच्या स्टेट यंग लॉयर्स असोसिएशनच्या प्रवक्त्या पदी निवड करण्यात आली. त्या प्रसिद्ध समाज प्रबोधनकारक आहे तसेच गेले दोन वर्ष वकील व्यवसायामध्ये त्यांचे काम अतिशय उल्लेखनीय आहे. नवोदित असणाऱ्या वकिलांसाठी त्यांच्या मागण्यांसाठी सदैव तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वकील संरक्षणाचा कायदा अमलात आणण्यासाठी त्यांचा लढा सुरू आहे. महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिल 2026 च्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्टेट यंग लॉयर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांनी उमेदवार अॅड. रणजीत बापुसो गावडे यांना अधिकृत पाठिंबा जाहीर केला.
यासोबतच असोसिएशनच्या प्रवक्त्या पदावर अॅड. वृषाली इंगळे यांची निवड करण्यात आली. यावेळी स्टेट यंग लॉयर्स असोसिएशन, अध्यक्ष अॅड. चेतन शिंदे, वाईस प्रेसिडेंट अभिषेक देवकर, व्हाईस प्रेसिडेंट सलमान मालदार, मुख्य प्रवक्त्या वृषालीताई इंगळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अॅड. महेश नलवडे, आणि अॅड. स्वरूपा भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा