Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १८ मार्च, २०२६

*रमजान ईद निमित्त अकलूज नगर परिषदेच्या वतीने ईदगाहाची साफसफाई केल्याने* *भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने मानले आभार*

 *मुख्य संपादक*

   *टाइम्स 45 न्यूज मराठी*

           *मो:-9730867448*


रमजान( ईद ईद उल फितर ) निमित्त मुस्लिम बांधवांना ईद ची नमाज अदा करण्यासाठी इदगाह मैदान अस्वच्छ होते त्याची स्वच्छता करण्यासाठी भारतीय जनता पार्टी अकलूज मंडळ अल्पसंख्यांक मोर्चा घ्या वतीने ईदगाह साफसफाई आणि रंगरंगोटी करण्यासाठी अकलूज नगर परिषदेला निवेदन देण्यात आले होते त्या अनुषंगाने अकलूज नगर परिषद प्रशासनाने तात्काळ  कामाला सुरुवात केली असून रमजान ईद पूर्वी ते पूर्ण होणार असून अकलूज नगरपरिषदेने काम हाती घेतल्याने अकलूज नगर परिषदेचे भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने आभार मनःपूर्वक व्यक्त करण्यात आले आहे 



​भारतीय जनता पार्टी, अकलूज शहर अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष अमर भाई शेख यांनी २७ फेब्रुवारी २०२६ रोजी अकलूज नगरपरिषदेला ईदगाह परिसराच्या साफसफाई आणि रंगरंगोटी संदर्भात एक निवेदन दिले होते.


​या निवेदनाला नगर परिषदेमार्फत अतिशय चांगला आणि जलद प्रतिसाद मिळाला असून, प्रत्यक्ष जागेवर साफसफाई करून रंगरंगोटीच्या कामाला सुरुवात झाली आहे. या सकारात्मक आणि तत्परतेने काम हाती घेतल्याने समाजाच्या वतीने ही त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे


​आज या चालू कामाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्यात आली.              


            याप्रसंगी अकलूज नगरपरिषदेचे गटनेते तथा नगरसेवक राहुल भैय्या लोंढे, भारतीय जनता पार्टीचे अकलूज शहर सरचिटणीस संतोष कृष्ण वाघमोडे आणि अमोल माने भारतीय जनता पार्टी अकलूज शहर मंडल अल्पसंख्यांक मोर्चाचे अध्यक्ष अमर शेख इत्यादी उपस्थित होते. तसेच सर्वांच्या सहकार्याने हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल, हा विश्वास व्यक्त करण्यात आला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा