Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २९ मार्च, २०२६

*प्रदीप गारटकर: संघर्षाचा महामेरू आणि ध्येयवादाचा धगधगता झंझावात.!*

 इंदापूर, डॉ. संदेश शहा*.

टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक, मो. ९९२२४१९१५९



​इंदापूर तालुक्याच्या राजकीय क्षितिजावर गेल्या चार दशकांपासून एक नाव सातत्याने तळपत आहे, ते म्हणजे आदरणीय प्रदीपजी गारटकर. 'राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसून ते समाजपरिवर्तनाचे साधन आहे', हे आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करणाऱ्या या लोकनेत्याचा आज वाढदिवस. एका सामान्य कुटुंबातून येऊन, कोणत्याही राजकीय वारशाशिवाय केवळ जनशक्तीच्या जोरावर प्रस्थापितांच्या बालेकिल्ल्याला आव्हान देणं, ही प्रदीप गारटकर यांची खरी ओळख 

​   पतित पावन ते जनसामान्यांचा आवाज

​९० च्या दशकात जेव्हा इंदापूरचे राजकारण ठराविक घराण्यांभोवती फिरत होते, तेव्हा प्रदीप गारटकरांनी 'पतित पावन' संघटनेच्या माध्यमातून युवकांचे मोठे संघटन उभे केले. जात, धर्म आणि पंथाच्या पलीकडे जाऊन त्यांनी शोषितांचा आणि वंचितांचा आवाज बुलंद केला. इंदापूरच्या गल्लीबोळात शाखांचे जाळे विणून त्यांनी तरुणांच्या मनात अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द निर्माण केली. याच संघटनशक्तीच्या जोरावर त्यांनी इंदापूर नगरपालिकेवर आपला झेंडा फडकवला आणि नगराध्यक्ष म्हणून शहराच्या विकासाला नवी दिशा दिली.

गोर गरीब नागरिकांचे आरोग्य केंद्रबिंदू मानून त्यांनी आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचा लाभ हजारो, लाखो लोकांना झाला. त्यांच्यामुळे हजारो लोकांच्या शस्त्रक्रिया मोफत झाल्या तर काहींच्या अल्पदरात झाल्या. कोरोना महामारी मध्ये सुद्धा त्यांनी हजारो नागरिकांचे प्राण वाचविले. तालुक्यात वडापुरी येथे सहकारी तत्वावर हनुमंत तोबरे अण्णा यांच्यासमवेत पाणी वापर संस्था काढून त्यांनी अनेकांच्या शेतीला पाणी उपलब्ध करून दिले. त्यामुळे हा परिसर सुजलाम सुफलाम होण्यास मदत झाली. इंदापूर तालुक्यास लाभलेले नीरा भीमा नद्यांचे खोरे, उजनी धरण पाणलोट क्षेत्र, शेकडो वर्षापूर्वी बांधलेला शेटफळ हवेली येथील तलाव यांचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. तालुक्यातील समस्या व त्यावर उपाययोजना यांचा देखील त्यांचा सखोल अभ्यास आहे. सद्गुरू वामनराव पै यांचे आध्यात्मिक शिबिर इंदापूर येथे घेऊन त्यांनी शहरास आध्यात्मिक पर्वणी दिली. पूर्वी सिनारमास आता बी जी पी एल कारखान्यात स्थानिक नागरिकांना रोजगार मिळावा म्हणून त्यांनी केलेले आंदोलन लोकप्रिय ठरले होते. त्यामुळे अनेक तरुणांना नोकरी मिळाली. त्यांचे कुटुंब आत्मनिर्भर झाले.

​पराभवाने न खचणारा झुंजार नेता.

​प्रदीप गारटकर यांच्या वाट्याला राजकीय प्रवासात अनेकदा पराभव आले. विधानसभेच्या तीन निवडणुकांमध्ये अपयश आले, तरीही हा माणूस डगमगला नाही. इंदापूरसारख्या ठिकाणी, जिथे जातीय समीकरणे प्रबळ आहेत, तिथे अल्पसंख्याक समाजातून येऊनही केवळ आपल्या वत्कृत्वशैलीने आणि जनसंपर्काने त्यांनी आपला प्रभाव टिकवून ठेवला. ४० वर्षांपासून सत्तेत असो वा नसो, जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरणारा हा एकमेव योद्धा आहे. अपयशाला पायाखाली तुडवून पुन्हा तितक्याच जोमाने उभे राहण्याची धमक त्यांच्या मनगटात आजही कायम आहे.

​राजकीय प्रवास आणि अफाट जनसंपर्क.

​त्यांचा राजकीय प्रवास हा अनुभवांनी समृद्ध आहे. पतित पावन संघटना, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पुन्हा भारतीय जनता पार्टी अशा विविध वळणांवर त्यांनी काम केले. या प्रवासात त्यांनी अनेक राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय पदे भूषवली. प्रत्येक पक्षात काम करताना त्यांनी केवळ स्वतःचा विचार न करता, पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळवून दिला. सर्वच पक्षांतील नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी असलेले त्यांचे स्नेहाचे संबंध त्यांच्या अफाट जनसंपर्काची साक्ष देतात.

​वयाची साठी ओलांडली अन् तिशीचा उत्साह.

​आज वयाची साठी ओलांडल्यानंतरही प्रदीप गारटकरांमध्ये तोच जोश, तीच ऊर्जा आणि तीच संघटन करण्याची क्षमता दिसून येते. समाजातील दादागिरी आणि गुंडगिरीला पायबंद घालण्यासाठी त्यांनी कायम पुढाकार घेतला. त्यांच्या धारदार वाणीतून निघणारे शब्द आजही श्रोत्यांच्या काळजाला भिडतात. "संघर्ष ज्याच्या खिशात आहे" अशा या माणसाकडून आजच्या तरुण पिढीने जिद्द आणि चिकाटी शिकण्यासारखी आहे.

​इंदापूरच्या या 'झंजावाता'ला, लोकनेते प्रदीपजी गारटकर यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!

श्री. शशिकांत तरंगे

प्रदेश प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तथा प्रदेश कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष, इंदापूर जिल्हा पुणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा