Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २९ मार्च, २०२६

*गिरझणी येथे अनेक वर्षांपासून बोअरवेलचा बंद असलेला पाणीपुरवठा पूर्ववत सुरू.* *डाॅ.धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या* *प्रयत्नाला यश*.

 *अकलूज --प्रतिनिधी* 

 *केदार लोहकरे*

   *टाइम्स 45 न्यूज मराठी*


गिरझणी (ता.माळशिरस) येथील साठे वस्ती व हेगडे वस्ती येथे गेली अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा  बंद अवस्थेत असलेल्या बोअरवेलच्या संदर्भात ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते डॉ.धवलसिंह मोहिते पाटील  याचेकडे तक्रार केली होती.त्यांनी तक्रारीची तात्काळ दखल घेत बोअरमध्ये नवीन मोटार बसवून पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला.

          या कामाच्या शुभारंभ प्रसंगी डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या  उपस्थितीत पाणीपुरवठा सुरळीत करून मोटरीचे पूजन करण्यात आले व पाणी  पूजन करण्यात आली.गिरझणीच्या ग्रामस्थांना पाण्याची सोय करून दिली.गावातील लोकांची पाण्याची सोय करणे ही आपली जबाबदारी आहे आणि पुढे ही अशा मूलभूत गरजांसाठी मी सदैव तत्पर राहीन असे यावेळी डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी ग्रामस्थांना सांगितले.तसेच गिरझणी गावाच्या विकासात स्वत: लक्ष घालून समस्या सोडविण्याचा शब्द ग्रामस्थांना दिला.त्यावेळी हेगडे वस्ती येथे रस्त्याची पाहणी करून पुढे पंचायत समितीला सूचना देण्यात आले आहेत.

           यावेळी दादासाहेब नामदास,सागर देशमुख,शंकर चव्हाण,पत्रकार कृष्णा लावंड, सुभाष साठे,बापू साठे,विजय लोखंडे,सतीश भिंगारदेवी,साधू साठे,हमु साठे,मच्छिंद्र हेगडे,अवि साठे आदी गिरझणी ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा