Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २० मार्च, २०२६

युवा नेते सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जि.प.शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप.

 *विशेष प्रतिनिधी ---बाळासाहेब गायकवाड अकलूज*



अकलूज नगरपरिषदेचे नूbतन कर्तव्यदक्ष नगरसेवक,युवकांचे ह्दय सम्राट व युवा नेते सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुला व मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.या कार्यक्रमासाठी सयाजीराजे मोहिते-पाटील उपस्थित राहून दप्तर,वह्या, पुस्तके,वाॅटरबॅग यांचे वाटप करण्यात आले.त्यामुळे या शाळेतील मुलांसाठी हा आनंदाचा क्षण बनला.यावेळी अकलूज नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सौ.प्रतिभा विलासनंद गायकवाड,प्रियंका लखन गायकवाड राहुल जाधव, या कार्यक्रमाचे आयोजक अभिषेक गायकवाड, गणेश वाघमारे,चरण साळुंखे, अविनाश सोनवणे,गोपाल मस्तुद, संतोष बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते.

       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा