Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १ मार्च, २०२६

साईबाबा शिक्षण प्रसारक मंडळ शेळगी सोलापूर संचलित साईबाबा विद्यामंदिर व समाधान माध्यमिक प्रशाला, दहिटणे (सोलापूर) येथे मराठी भाषा गौरव दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

 *उपसंपादक --नूरजहाँ शेख*

       *टाइम्स 45 न्यूज मराठी*



साईबाबा शिक्षण प्रसारक मंडळ शेळगी सोलापूर संचलित साईबाबा विद्यामंदिर व समाधान माध्यमिक प्रशाला, दहिटणे (सोलापूर) येथे मराठी भाषा गौरव दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला 

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक व कविवर्य डॉ. लक्ष्मण हेंबाडे सर,सुप्रसिद्ध गझलकार बदीउज्जमा बिराजदार,कविवर्य रामप्रभु माने,कविवर्य खाजाभाई बागवान,कवयित्री महानंदा बागेवाडी,कवयित्री अनिता विभुते राजमाने,कवयित्री विठाबाई ताटे-राऊत या सर्व मान्यवरांनी स्वरचित कविता व गझल सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.व्यासपीठावर मुख्याध्यापक श्री. इरफान शेख सर, दहिटणे गावातील जेष्ठ नागरिक मा. विठ्ठल लोहार सर, मा. सूर्यकांत जतकर काका, मा. नाईकवाडी साहेब, मुख्याध्यापिका पेरणे मॅडम तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन मा. श्रीमती निगारसुलताना नाईकवाडी मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन मा. श्रीमती मंजुषा भोज मॅडम यांनी मानले.या प्रसंगी मराठी भाषा व विज्ञान वृत्ती वाढीसाठी निबंध लेखन, वक्तृत्व, भाषण, कविता वाचन, वैज्ञानिक प्रयोग, साहित्य सादरीकरण, रांगोळी अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा