*उपसंपादक --नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
मदरशात मुखोद्गत होते पवित्र कुराण,
कसे म्हणता मदरसा आतंकवादीचे स्थान?||धृपद||
मदरशांमध्ये दिले जाते धर्माचे शिक्षण
तरी का म्हणताय येथे चालते कारस्थान
लहानांना माया मोठ्यांना आदब,मान
कसे म्हणता मदरसा आतंकवादीचे स्थान? ||१||
द्वेष नव्हे प्रेमाचा दिला जातो संदेश छान
इथे घडतो इमान, इथे वाढतो सन्मान,
ज्ञानाच्या प्रकाशाने घडतो सच्चा इन्सान
कसे म्हणता ! मदरसा आतंकवादीचे स्थान||२||
संस्काराने उभा राहतो प्रेमाचा परिवार
म्हणून दिसत नाही येथे वृद्धाश्रमाचा बाजार
मदरशाची शिकवण घडवते माणुसकीचा हिंदुस्तान
कसे म्हणता ! मदरसा आतंकवादी चे स्थान? ||३||
आई जन्नत असते, वडील जन्नतीचा दरवाजा महान,
त्यांच्या सेवेतच असतो आयुष्याचा खरा अभिमान.
पालकाचा आदर, संभाळ हेच असते गान
कसे म्हणता ! मदरसा आतंकवादीचे स्थान? ||४||
शेजाऱ्यांशी बंधुत्व, प्रेमाचा संदेश,
माणुसकी शिकवण्याचाच असतो खरा उद्देश
बालपणापासूनच मुलांना मिळते ही शिकवण
कसे म्हणता ! मदरसा आतंकवादीचे स्थान ||५||
एवढा मोठा कुराण पाठ करणे खेळ नाही,
नावे ठेवणाऱ्यांनी पाठ करावे पान काही
येईल मग तुम्हालाही परिश्रमाचे भान
कसे म्हणता! मदरसा आतंकवादीचे स्थान?||६||
मदरशात मुखोद्गत होते पवित्र कुराण,
कसे म्हणता! मदरसा आतंकवादीचे स्थान!!?
अनिसा सिकंदर, दौंड
९२७००५५६६६





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा