उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
तंबाखूमुक्त शाळा कार्यक्रम व मादक पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत जागरूकता कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुली नंबर तीन व मुले नंबर दोन गणेशनगर अकलूज येथे उत्साहात संपन्न. या कार्यक्रमास लाभलेले प्रमुख वक्ते प्राध्यापक . धनंजय देशमुख सर यांनी विद्यार्थ्यांना व्यसन व त्याचे दुष्परिणाम याचे खूप छान मार्गदर्शन केले.
त्यांनी विद्यार्थ्यांना आता सध्या विद्यार्थ्यांमध्ये चालू असलेले व्यसन म्हणजे कोको कोला, स्टिंग,थम्सअप याचे शरीरावर होत असलेले परिणाम त्यांनी विद्यार्थ्यांना विविध उदाहरणाद्वारे समजावून सांगितले त्यामुळे विद्यार्थ्यांना ते समजण्यास सोपे झाले. तसेच ते सर्पमित्र असल्यामुळे विविध विषारी आणि बिनविषारी सापांची त्यांनी माहिती मुलांना सांगितली. व मुलांना शपथ दिली. रत्नाई कृषी कृषी महाविद्यालयाच्या भोसले मॅडम आणि त्यांची महाविद्यालयातील टीम यांनी यावर पथनाट्य सादरीकरण केले
दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांच्या वर्तनात बदल होणेइतका परिणामकारक असा कार्यक्रम झाला .या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले नंबर दोन च्या मुख्याध्यापिका सुकुमारी अंगुले मॅडम, .मनीषा बळवंतराव मॅडम,. अंजली अडाणे मॅडम, . दत्तात्रय गायकवाड सर, तय्यब शेख सर, फातिमा मुलाणी मॅडम ,.श्रीकांत राऊत सर , हाजराबी बांगी मॅडम, तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुली नंबर 3 चे मुख्याध्यापक दत्तात्रय कोरे सर, . महादेव नागणे सर, रेखा कोळी मॅडम, .पांडुरंग मोहिते सर, सुरैय्या कोरबू मॅडम, .वर्षाराणी जाधव मॅडम, .समीर कोरबु सर व करीना शेख मॅडम उपस्थित होते.
-----------------------------------©--------------------------------







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा