*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
उमरड (ता.करमाळा) येथील कु.नेहा मोहन चौधरी हिची धर्मदाय निरीक्षक पदी नियुक्ती झाली आहे.महाराष्ट्र राज्य धर्मादाय आयुक्त मुंबई कार्यालयांतर्गत परीक्षा घेऊन ही निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या धर्मादाय आयुक्त कार्यालय अंतर्गत सन 2025 या वर्षात घेण्यात आलेल्या परीक्षा मध्ये त्यांनी घवघवीत यश मिळवले आहे
नेहा चौधरी चे प्राथमिक शिक्षण उमरड येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये तर माध्यमिक शिक्षण हे उमरड येथील वामनराव बदे माध्यमिक विद्यालयात झाले आहे तसेच महाविद्यालय शिक्षण जेऊर येथील भारत महाविद्यालयात झाले तर पुढील कृषी पदवीचे शिक्षण दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठात झाले आहे नेहा चौधरी एका सामान्य शेतकऱ्याची मुलगी आहे लहानपणापासून हुशार व जिद्दी असणाऱ्या नेहाचे धार्मिक ग्रंथांचे वाचन उल्लेखनीय आहे
. तिच्या यशाबद्दल तिचे उमरड येथील प्राचार्य संपत कोठावळे सह विद्यालयाचे शिक्षक संतोष बदे, नंदकुमार वलटे सह ह भ प चिंतामणी महाराज घोडके, रामेश्वर महाराज शिंदे, विठ्ठल महाराज पाटील, संजय महाराज बाबर आदींनी विशेष अभिनंदन केले आहे तिच्या या घवघवीत यशाबद्दल तिचे उमरड व परिसरामध्ये विशेष कौतुक होत आहे
मी माझ्या आई वडिलांची इच्छा पूर्ण केली असून माझ्या यशामागे माझ्या आई-वडिलांचे तसेच गावातील विद्यालयाच्या शिक्षकांचे मोठे योगदान आहे नियमित व सातत्याने अभ्यास केल्याने मी सदरचे यश संपादन करू शकले असल्याचे नेहा चौधरी यांनी बोलताना सांगितले





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा