*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी नामदेवराव जगताप यांचे ज्येष्ठ चिरंजीव पृथ्वीराज जगताप यांचा वाढदिवस नुकताच त्यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साह वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी त्यांचे असंख्य कार्यकर्ते यावेळी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे शहर मंत्री पृथ्वीराज जगताप यांच्या वाढदिवसाला करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप, काँग्रेस आयचे करमाळा तालुका अध्यक्ष प्रतापराव जगताप, माजी नगरसेवक राहुल जगताप, नगरसेवक रवीभाऊ जाधव,भाजपा करमाळा तालुका युवा मोर्चा अध्यक्ष शुभम बंडगर, तसेच संग्राम माने,गौरव सावंत, सौरभ शिंगाडे, शुभम ढाणे याशिवाय त्यांचे बहुसंख्य चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करीत पृथ्वीराज जगताप यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीने पृथ्वीराज जगताप यांचा शाल फेटा श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना पृथ्वीराज जगताप म्हणाले की आजच्या माझ्या वाढदिवसाला माझ्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले असेच प्रेम माझ्यावर असू द्या आपले प्रेम सदिच्छा माझ्या पाठीशी सदैव राहील अशा शब्दात त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले
सदरच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला करमाळा शहर तसेच परिसरातील पृथ्वीराज जगताप यांचे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा