Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १२ मार्च, २०२६

*शिवसेना जिल्हाध्यक्ष* *महेश* *चिवटे यांचे *शिवमहोत्सवाला करमाळाकरांचा भरभरून प्रतिसाद*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*



        ६ मार्च रोजी  तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त , करमाळा शहरामध्ये प्रथमच . ६ मार्च ते ८ मार्च दरम्यान

३ दिवसाचा भव्य दिव्य असा  शिवमहोत्सवाचे आयोजन 

महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून सोलापूर जिल्हा शिवसेना अध्यक्ष माननीय महेश दादा चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा तालुका शिवसेना मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समिती तर्फे

या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते .या

भव्य , या महोत्सवामध्ये

करमाळाकरांसाठी 

मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रम त्याचप्रमाणे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले होते.


शुक्रवार दिनांक ६ मार्च रोजी सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला महाभिषेक करण्यात आला. यानंतर मर्दानी खेळ  स्पर्धा घेण्यात आली .त्याचबरोबर शिवप्रसाद वाटप करण्यात आला


याच दिवशी रक्तदान शिबिर यानंतर सायंकाळी,

ह भ प गोरख महाराज तुपे (आळंदी )यांच्या भारुडाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता .

यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी ७ मार्चला वटवृक्ष श्री स्वामी समर्थ वृंदावन 

भूमि पूजन सोहळा 

मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.


याच दिवशी सायंकाळी तालुक्यातील विविध क्षेत्रातील प्राविण्य मिळवलेल्या कर्तबगार महिला व पुरुषांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला .व सायंकाळी शाहीर महाविजेता अविष्कार देशिंगे, यांचा शाहिरी पोवाडयाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

तिसऱ्या दिवशी रविवार दिनांक ८ मार्च रोजी सकाळी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य दूत श्री मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिर व मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप करण्यात आले.

या शिबिरामध्ये नेत्र रुग्णांना (२७५ )चष्मा चे मोफत वाटप करण्यात आले. व गरजू रुग्णांना ३  लाख रुपयांची औषधे वाटप करण्यात आली .

याच दिवशी सायंकाळी महिला दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला

खास महिलांसाठी सिने अभिनेत्री आपणास दळवी यांचा न्यू होम मिनिस्टर हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

यामध्ये महिलांसाठी रोख रकमेसह ,टीव्ही ,फ्रिज मिक्सर ,कुलर ,सह मोठमोठे बक्षिसे

विजेत्या महिलांना देण्यात आली.

हे सर्व कार्यक्रम करमाळा येथील देवीचा माळ रोड करमाळा येथील तुळशी वृंदावन परिसरात घेण्यात आला होता.

या तीन दिवसीय ,"शिवमहोत्सव " उत्सवाला

 करमाळा तालुक्यातील 

महिला व पुरुष मंडळी सह शहरवासीयांनी भरभरून  प्रतिसाद दिला. करमाळा शहरात प्रथमच असा भव्य दिव्य आणि आगळावेगळा सांस्कृतिक सामाजिक

स्वरूपाचा "शिवमहोत्सव "आयोजित केल्याबद्दल तालुक्यातील सर्व स्तरातून महेशदादा चिवटे  यांचे विशेष कौतुक केले जात आहे .

या पूर्ण महोत्सव पार् 

पाडण्यासाठी

शहरातील शिवसेना शिंदे गटाचे 

पदाधिकारी महेश दादा चिवटे , दिनेश घोलप ,

नागेश चेंडगे , यांच्या सह् सर्वच  सन्माननीय सदस्यांनी

आहोरात्र परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा