Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २० मार्च, २०२६

*सातारा येथील करुणा गो शाळेत ' गो संवर्धनाची गुढी*

 *इंदापूर, डॉ. संदेश शहा*

*टाइम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९*



हिंदू नववर्ष आणि गुढीपाडवा सणानिमित्त  गुरुवारी संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण असताना तसेच राज्यभरात मराठी बांधवांनी आपल्या घरांवर गुढी उभारून नववर्षाचे मोठ्या उत्साहात स्वागत करत असताना 

साताऱ्यातील करुणा मंदिर गोशाळेत ' गो संवर्धनाची गुढी ’ उभारून गो संवर्धन तसेच गोरक्षासाठी संकल्प करण्यात आला.

गो संवर्धन ही भारतीय संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया आहे. देशी गोवंशाचे जतन करण्यासाठी गो संवर्धनाची गुढी उभारण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. गोसेवा  आध्यात्मिक आणि आर्थिक विकासाचा मार्ग मानला जातो, ज्यातून शेतीसाठी नैसर्गिक खते (गोबर) आणि आरोग्यदायी दूध मिळते. आजच्या गुढीपाडव्याच्या शुभ दिनी गाईंचे संवर्धन गोरक्षण करण्याचे आवाहन करत करुणा गोशाळेत व संवर्धनाची गुढी उभारण्यात आली. विदित भिडे यांनी ही अभिनव गुढी उभारली. गो शाळेचे अध्यक्ष दीपचंद ओसवाल, कार्याध्यक्ष ललित गुंदेचा, सचिव

प्रफुल्ल मेहता,

संचालक राकेश ओसवाल यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक विवेक भिडे यांनी हा उपक्रम राबविला. 

यानिमित्त अध्यक्ष दीपचंद ओसवाल म्हणाले,भारतीय शेतीस नवसंजीवनी देण्यासाठी शेणखत उपयुक्त आहे तर जीवनशैलीचे दुर्धर विकार बरे किंवा सुसह्य करण्यासाठी देशी गोवंशापासून तयार केलेले प्रॉडक्ट रामबाण उपाय ठरू शकतात. त्यामुळे देशी गो संवर्धन होणे ही काळाची गरज आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा