Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २० मार्च, २०२६

*अखेर...* *महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा मुख्यमंत्र्याकडे राजीनामा..*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*


महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, रूपाली चाकणकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सादर केला असून तो राजीनामा  स्विकारणेबाबत मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे 

    याबाबत सविस्तर वृत्त असे की ज्योतिष्यकार कॅप्टन अशोक खरात यांचे वादग्रस्त आणि अश्लील व्हिडिओ महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे फोटो व व्हिडिओ  माध्यमांसमोर आल्यानंतर त्या अशोक खरात ला बाबा मानणाऱ्या रूपाली चाकण त्या  स्त्री  लंपट कॅप्टन अशोक खरात बाबा यांचे पाय धुवत असत असे माध्यमातून बोलले जात असताना त्यांच्यावर टिकेची झोड उडत आहे त्यामुळे रूपाली चाकणकर यांना अखेर राजीनामा द्यावा लागला त्यांनी राजीनामा पत्रक दिलेले माहिती अशी की

मी, सौ. रुपाली निलेश चाकणकर, वरील विषयान्वये आपणांस विनंतीपूर्वक कळवू इच्छिते की, दि. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी माझी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली होती. माझ्या वैयक्तिक कारणाने मी स्वेच्छेने सदर पदाचा राजीनामा ह्या पत्राद्वारे आपणांस सादर करत आहे.

आजवर माझ्यावर विश्वास दाखवून आपण मला सर्वतोपरी सहकार्य केले त्याबद्दल मी आपली व सर्व सहकाऱ्यांची शतशः ऋणी आहे. भविष्यातही आपले असेच सहकार्य राहील असा मला विश्वास आहे.

तरी आपण माझा अध्यक्षा, राज्य महिला आयोग ह्या पदाचा राजीनामा स्वीकारावा अशी आपणांस नम्र विनंती आहे. असेही राजीनामा पत्रात नमूद केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा