*मंगरूळ तुळजापूर प्रतिनिधी*
चांदसाहेब शेख
*टाइम्स 45 न्यूज- मराठी*
रमजान हा इस्लाम धर्मियांसाठी अत्यंत पवित्र महिना मानला जातो पवित्र रमजान महिन्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण उपवास (रोजा) ठेवून , नमाज पठण कुरान पठण, गरजूंना मदत करून अल्लाहची इबादत करतात अशाच या पवित्र महिन्यात तुळजापूर तालुक्यातील मौजे मंगरुळ येथील युवा पत्रकार चांदसाहेब शेख यांची कन्या तर डॉ एपीजे अब्दुल कलाम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेकुंबर शेख यांची पुतणी व ऍड.जमीर शेख यांची बहीण अलमिरा उर्फ बिस्मिल्लाह शेख (वय १० वर्षे) हिने कडक उन्हाळ्यातही रोजा ठेवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
इतक्या लहान वयात आलमिरा हिने उपवास ठेवून धार्मिक संस्कारांचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. कडक उन्हाच्या वातावरणातही जिद्द, श्रद्धा आणि संयम दाखवत तिने रोजा पूर्ण केल्याने गावात तिच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे घरातील धार्मिक वातावरण आणि संस्कारामुळेच तिने लहान वयापासूनच रोजा ठेवण्याचा संकल्प केला होता यावर्षी तिने संपूर्ण महिनाभर अखंडपने रोजा ठेवला तिच्या या निर्धाराचे गावातील नागरिक, मित्रपरिवार तसेच नातेवाईकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
“लहान वयातच मुलांमध्ये धार्मिक संस्कार रुजले तर भविष्यात ते समाजासाठी चांगले कार्य करतील,” अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली. आलमिरा हिच्या या प्रेरणादायी कृतीमुळे इतर लहान मुलांनाही धार्मिक आचार-विचारांचे महत्त्व समजत असल्याचे सांगितले जात आहे.
कडक उन्हाळ्यातही १० वर्षांच्या या चिमुकलीने रोजा ठेवून दाखवलेली श्रद्धा आणि जिद्द पाहून परिसरात तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे
""""""""""""""""""""""""""""""""""""
*चौकट*
*आलमिरा उर्फ बिस्मिल्लाहच्या संपूर्ण कुटुंबियांनी आमच्या प्रतिनिधिशी बोलताना सांगितले की,प्रचंड जिद्दी, सालस निरागस असूनही त्याने स्वतःहून महिनाभर रोजा ठेवण्याची इच्छा व्यक्त केली व विशेषतः प्रचंड उत्साहाने पहाटे तीन ते चारच्या दरम्यान ती स्वतः उठायची दिवसभर त्याने धैर्य, संयम राखत आपले महिनाभराचे रोजे यशस्वीरित्या पूर्ण केले त्याच्या या महिनाभरातील प्रचंड संयमाने , शिस्तीने, श्रद्धेने आम्हीही भारावून गेलो आहोत कारण इतकी सहनशक्ती अल्लाहने त्याला प्रदान केली - संपूर्ण शेख परिवार मंगरुळ ता. तुळजापुर*
"""""""""'"""""""""""""""""""""""""""""""




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा