*अकलूज प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
अकलूज येथे आज जागतिक महिला दिनानिमित्त जिजाऊ ब्रिगेड शाखा पंढरपूर विभाग यांचे वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अकलूज पोलीस स्टेमनच्या पोलिस उपनिरीक्षक करिश्मा वनवे मॅडम यांनी महिला विषयी कायदा व महिलांची सुरक्षा याविषयी मार्गदर्शन केले.त्यांच्या समवेत महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल अलका कदम मॅडम उपस्थित होत्या.या कार्यक्रमामध्ये कर्तृत्त्ववान महिलांची माहिती व महिलांचे सक्षमीकरण यांवर चर्चा करणेत आली तसेच महिलादिनाचे औचित्य साधून महिलांनी गाणी,कविता सादर केल्या तसेच आज दुग्धशर्करा युक्त योग म्हणजेच महिलादिन व रंगपंचमी असल्याने दोन्ही सण मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी जिजाऊ ब्रिगडचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.यामध्ये शिवमती अक्काताई माने (प्रदेश संघटक),प्रियाताई नागणे (प्रदेश सहसंघटक),मनोरमाताई लावंड (जिल्हाध्यक्ष,सोलापूर विभाग), मनीषा गायकवाड (जिल्हा उपाध्यक्ष),सुवर्णा घोरपडे (जिल्हा प्रवक्ता),शुभांगी क्षीरसागर (जिल्हा कोषाध्यक्ष),शारदा चव्हाण (तालुकाध्यक्ष),आशा सावंत (तालुका उपाध्यक्ष),कल्पना चव्हाण (तालुका कार्याध्यक्ष),सुनिता नडगिरे (तालुका प्रवक्ता),वंदना पवार (संघटक),हेमा सांगडे (संघटक)
कुंदा पिसे सदस्य,लता शिंदे व सर्व सदस्य महिलांनी महिलादिन उत्साहात साजरा केला.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा